नवीन लेखन...

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ८ – अशोक वृक्ष

बागेत पिरॅमिडसारखा दिसणारा, शोभेसाठी लावलेला जो ‘अशोक’ म्हणून ओळखला जातो, तो अशोक वृक्ष नसून ‘आशुपल्लव’ वृक्ष आणि सीतेला अशोकवनात ठेवले होते तो वृक्ष म्हणजे अशोक किंवा सीता अशोक. दोन्हींची कुळे वेगळी आहेत. सीता अशोक सीसॅल्पिनिऑइडी,लेग्युमिनोजी ) व हिरवा अशोक अनॊनेसी कुळातील आहे.
मूळचा भारत-श्रीलंकेतला असलेला ‘सीता अशोक’ हा वृक्ष सुंदर दिसणाऱ्या सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो.

सीता अशोक :

पौराणिक महत्त्वामुळे ‘सीतेचा अशोक’ म्हणून सामान्यतः ओळखला जाणारा हा सुंदर व सदापर्णी वृक्ष श्रीलंका, ब्रह्मदेश, मलाया, बांगलादेश व भारत (कोकण, सह्याद्री, उत्तर कारवार, मध्य व पूर्व हिमालय) इ. प्रदेशांतील सदापर्णी जंगलात तुरळकपणे आढळतो, पण अनेक बागांतून मात्र तो लावलेला दिसतो. याची गणना कांचन, बाहवा, अंजन इत्यादींच्या उपकुलात (सीसॅल्पिनिऑइडी,लेग्युमिनोजी ) केली असून त्यांच्याशी काही शारीरिक लक्षणांत त्याचे साम्य आहे.

हा अशोक अनेक नावांनी ओळखला जातो. अशोक (अ शोक), रक्ताशोक, वञ्जुल, नारीपाद्स्पर्श, रक्तपल्लव, ताम्रपल्लव, सुवर्णाशोक वगैरे. शास्त्रीय नाव Saraca asoca, Saraka indica . याची कोवळी पाने तपकिरी लाल रंगाची असतात. पाने संयुक्त, तीन ते सहा पर्णिकांच्या जोड्या. ग्रीष्म ऋतूत मार्च ते मे महिन्यात हा फुलतो. याला चार पाकळ्यांची, पिवळसर फुले गुच्छात येतात. हळूहळू ती केशरी आणि मग लालबुंद होतात. असा बहरलेला अशोक वृक्ष पाहणे हि एक पर्वणीच असते.

अशोकाच्या सुंदरतेची आणि औषधी गुणधर्माची अनेक वर्णने संस्कृत श्लोकांमधून केलेली असली, तरी हे झाड तितकंसं परिचित झालेले दिसत नाही. साधारण ९-१० मीटर इतकी उंची असलेल्या अशोक वृक्षाचे खोड धुरकट तपकिरी रंगाचे असते. पसरलेल्या फांद्यांमुळे आणि दाट पर्णसंभारामुळे तो लहानसा पण सुडौल दिसतो. अशोक वृक्षाचा पानांचा बहरही देखणा असतो. पाने संयुक्त असून गर्द हिरव्या पर्णिका साधारण आंब्याच्या पानांसारख्या दिसतात. कोवळ्या असताना लालसर रंगाच्या लोंबत्या पर्णिका आतिशय सुंदर दिसतात. आदिवासी बायका त्या आवडीने केसात माळतात. अशोकाचे खरे वैभव म्हणजे त्याची फुले. फुलांचा बहर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येतो. हा बहर विशेषच असतो. मंद सुगंधी फूल चार गोलाकार पाकळ्यांचे असून लांब-लांब पुंकेसर फुलाच्या बाहेर आलेले असतात. फुले उमलताना पिवळ्या रंगाची, मग केशरी आणि शेवटी गडद नािरगी-लाल रंगाची होतात. एकाच गुच्छात या सर्व छटांची फुले दिसतात. झाडाच्या खोडाला अगदी जमिनीलगतच्या बुंध्यापासून ते फांद्यांवर, शेंडय़ापर्यंत हळदीकुंकवाच्या रंगाच्या फुलांचे गुच्छ लगडतात. याचं आणखी वेगळेपण म्हणजे, संपूर्ण झाड फुलांनी लगडलेले असलं तरी लांबट आकाराच्या शेंगा मात्र पानांच्या टोकालाच लागतात. प्रत्येक शेंगेत साधारण ५-६ काळसर राखाडी बिया असतात. त्यातली एखादीच बी पक्व असते. याची उंची ८-१० मी., साल गर्द तपकिरी किंवा पिंगट; संयुक्त व पिसासारखी पाने कोवळेपणी लोंबती व लालसर, एकाआड एक असून त्यांच्या बगलेत लहानसे उपपर्ण असते; दले -४–६ जोड्या व दल चकचकीत असते. याचे लाल फुलोरे (गुलुच्छ, पुष्पबंध) पानांच्या बगलेत डिसेंबर ते मेमध्ये येतात व त्यावर प्रथम पिवळसर, नंतर नारिंगी व शेवटी लाल दिसणारी फुले येतात. फुलांचे देठ, छदे व छदके [ फूल ] ही लाल असतात. पाकळ्यांच्या अभावी त्याखाली असलेला संवर्तच त्यांचे कार्य करतो. केसरदले ७ ते ८,फुलाबाहेर डोकावणारी व परागकोश जांभळट असतात. शिंबा (शेंग) गडद तपकिरी,चपटी,टोकदार व बिया ४–८ चपट्या व लांब असतात. नवीन लागवड बियांपासून होते

हिरवा अशोक :

हा (अशुपाल, आसुफल; हिं. देवदारू, दिकेदारी; क. पुत्रजीवी; इं. इंडियन फर, मॅस्ट ट्री; लॅ. पॉलिअ‍ॅल्थिया लाँगिफोलिया, कुल—अ‍नोनेसी) या नावांनी ओळखला जातो. हा एक मोठा (१५ मी. उंच) सदापर्णी वृक्ष मूळचा भारताच्या दक्षिण टोकाचा व श्रीलंकेचा, परंतु आता भारतात इतरत्र मोठ्या रस्त्यांच्या दुतर्फा व बागेत शोभेकरिता सामान्यपणे लावलेला आढळतो. अनेक रोग बरे करण्याचा गुण त्यात असल्याच्या समजुतीने पॉलिअ‍ॅल्थिया हे वंशवाचक नाव व त्याच्या लांब पानांच्या लक्षणांमुळे लाँगिफोलिया हे लॅटिन जातिवाचक नाव त्याला दिले आहे. लाल अशोकाप्रमाणे यालाही हिंदू लोक पवित्र मानतात त्यामुळे हा देवळांमध्ये अनेकदा लावला जातो. याची पाने चिवट, अरुंद, भाल्यासारखी, गुळगुळीत व चकचकीत, कडा तरंगित व टोक लांबट असते; ५-६ हिरवट फुलांचे चवरीसारखे झुबके बहुधा पानांच्या बगलेत फेब्रुवारी ते मे मध्ये येतात. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे अ‍ॅनोनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे; फळे प्रथम हिरवी (१८x१२ मिमी.), नंतर गर्द जांभळी; ती ऑगस्ट ते सप्टेंबरात पिकतात. नवीन लागवड ताज्या बियांपासून होते.
लाकूड हलके पण मजबूत असल्याने पेन्सिली, पिपे व ढोलक्याकरिता वापरतात. दुष्काळात गरीब लोक फळे खातात; एरवी पक्षी, वाघळे व माकडे खातात. सालीपासून चांगला धागा मिळतो. चीनमध्ये लाकडाचा उपयोग आग- काड्यांकरिता करतात. साल तापावर गुणकारी, पिरॅमिडासारखा दिसणारा व शक्यतो खोडाजवळ लोंबत राहणाऱ्या फांद्या असलेला अशोकाचा एक प्रकार (पेंड्यूला) हल्ली बागेत अनेक ठिकाणी आढळतो.

पिवळा अशोक

मूळचा भारतीय नसलेला पण सीता अशोकाचा भाऊ म्हणजे पिवळा अशोक. भारतात तसा अभावानेच आढळणारा.
मलेशिया म्यानमार थायलंड येथील सुंदर स्थानिक वृक्ष. ह्याची पाने आणि फुले अगदी आपल्या सीता अशोकासारखी, फुलांचा रंग फक्त रंग पिवळाधम्मक.
या फुलांना एक मंद सुवास असतो. असाच फुललेला पिवळा अशोक लालबाग वनस्पती उद्यान, बेंगळुरू येथे आहे.

अध्यात्मिक व पौराणिक महत्व:

हिंदू-बौद्ध धर्मात अशोक वृक्ष पवित्र मानला जातो. अशोकाच्या सुंदरतेची आणि औषधी गुणधर्माची अनेक वर्णने संस्कृत श्लोकांमधून केलेली असली तरी कालिदासाने या वृक्षाचे वर्णन आपल्या ऋतुसंहार काव्यात फार सुंदर केले आहे

‘आमूलतो विद्रुमरागताम्रं सपल्लवं पुष्पचयं दधानः’
(आरंभापासून पोवळ्यासारखा तांबडा रंग असणारे फुलांचे झुपके असणारा भरपूर पाने असलेला वृक्ष
असे वर्णन केले आहे)

अशोकनिर्भर्स्तितपद्मरागम्, आकृष्टहेमद्युतिकर्णिकारं
मुक्ताकलापीकृतसिन्धुवारं वसन्तपुष्पाभरणं वहन्ती I I

कुमारसंभवातील या श्लोकात पार्वतीने वसंतात फुलणाऱ्या फुलांची आभूषणे धारण केली होती याचे वर्णन आहे. त्यात अशोकाची फुले हि माणकांपेक्षाही शोभून दिसत होती असे वर्णन केले आहे

ह्याच्या फुलण्याबाबत अशी एक कवीकल्पना आहे कि, सुंदर स्त्रीच्या लत्ताप्रहाराने हा फुलतो.

एका आख्यायिके नुसार भगवान बौद्धांचा जन्म याच वृक्षाखाली झाला असे मानले जाते.

अशोक वृक्ष धार्मिक, सांस्कृतिक पारिवारिक जीवनात भारतीय लोक श्रद्धेय मानतात. ब्रहमवैवर्त पुराणात याचा उल्लेख शुभ व मंगलकारी वृक्ष असा केला आहे. प्राचीन मूर्तीत सुद्धा या वृक्षाची मुद्रा सापडते. ह्या वृक्षाची पूजा गंधर्व व यक्षांच्या काळा पासून केली जाते असा उल्लेख आहे.

भगवान श्रीरामाने सीतेच्या दर्शनाची इच्छा याच वृक्षा कडे केली होती. कालांतराने रामभक्त हनुमानास सीता अशोक वृक्षाखाली खाली बसलेली पाहून शोक मुक्ती झाली. भगवान वाल्मीकींच्या आश्रमा मद्धे जे शुभ वृक्ष लावले होते त्यात अशोक वृक्षाचा समावेश होता. हा वृक्ष इंद्र देवास प्रिय आहे कारण यास कामदेवाचे प्रतीक मानले जाते. पुष्पा धनवा (कामदेव) च्या पंचपुष्प बाणांमध्येही अशोक फुलांची गणना केली गेली आहे आणि स्मृतिवास, नट इत्यादी नावे देखील या समानार्थी शब्दात समाविष्ट केली गेली आहेत.
प्राचीन काळी अशोक बगीचा आणि बगीच्यांचा उपयोग सुख आणि दु:ख दूर करण्यासाठी केला जात होता. सनातनी वैदिक लोक या झाडास पवित्र आणि पूज्य मानतात.
आपल्या देशात हिंदू धर्मामद्धे अशोक वृक्ष हा पवित्र मनाला गेला आहे. बऱ्याच धार्मिक कार्यात याची पाने वापरतात. कारण अशोक वृक्ष आपल्या घरी आनंद, शांती व सुख आणतो असे समजले जाते. ज्योतिष शास्त्राप्रमाणे हा वृक्ष उत्तर दिशेला असला तर घराची भरभराट होते.

औषधी व इतर उपयोग :

आयुर्वेदात, अशोक झाडाची साल, पाने, फुले व बियाणे औषधासाठी वापरले जातात.

अशोक वृक्षाचे उपयोग:

त्याच्या वापराबद्दल आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्यानुसार अशोक वृक्ष औषधी पद्धतीने खालील मार्गांनी वापरता येतो.
• आपण दररोज त्याच्या मऊ पाने (दोन चमचे) पासून बनविलेले एक काढा घेऊ शकता.
• एक चमचे दररोज त्याची साल बारीक करून पावडर वापरता येते. आपण दररोज त्याच्या बियापासून बनविलेले अर्धा चमचे पावडर वापरू शकता.
• त्याच्या पाने आणि फुलांपासून बनवलेल्या पेस्टचा उपयोग जळजळपासून आराम मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.
• त्याच वेळी, अर्धा कप पाण्यात दोन चमचे, त्याच्या फुलांचे मूळ, साल आणि पाने यांचे रस वापरणे देखील फायद्याचे मानले जाते.
• सेवन करण्याचा वेळ- जरी याचा सकाळी त्याचा काढा, रस किंवा पावडर फायदेशीर मानला जातो, परंतु आपणास पाहिजे असल्यास आपण ते झोपत असताना सकाळी किंवा रात्री देखील वापरू शकता.

मधुमेहाची समस्या दूर करण्यासाठी अशोक वृक्ष देखील प्रभावी ठरू शकतो. कारण असे आहे की त्याच्या फुलांमध्ये हायपोग्लाइसेमिक (रक्तातील साखर कमी होणे) प्रभाव असलेले अनेक औषधी गुणधर्म आहेत. यामुळे, शरीरात इन्सुलिनची क्रिया वाढवून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी त्याचे सेवन प्रभावी असल्याचे सिद्ध होते.
अशोकाची साल फार स्तंभक (आकुंचन करणारी) असून दुधात उकळून गर्भाशयाच्या तक्रारीवर घेतल्यास गुणकारी व पौष्टिक आहे. फुले कुटून व पाण्यात कालवून रक्तातिसार, मूळव्याध व आमांश इत्यादींवर; सुकलेली फुले मधुमेहावर; बिया मूत्रविकारांवर; पाने शूलावर (तीव्र वेदनांवर) उपयुक्त व आरोग्यपुनःस्थापक (पुन्हा आरोग्य प्राप्त करून देणारी) असतात.

स्त्रीरोगविषयक समस्या दूर करते – स्त्रीरोगविषयक समस्या दूर करते . अनियमित मासिक पाळी, मासिक पाळी दरम्यान असह्य वेदना, ओटीपोटाचा स्नायू दुखण्याची समस्या, सक्रिय अंडी नसणे आणि गर्भवती होण्यास अडचण यासारख्या अनेक समस्या आहेत ज्या स्त्रीरोगात समाविष्ट आहेत. अशोकाची साल असून दुधात उकळून गर्भाशयाच्या तक्रारीवर घेतल्यास गुणकारी व पौष्टिक आहे. फुले कुटून व पाण्यात कालवून रक्तातिसार, मूळव्याध व आमांश इत्यादींवर; सुकलेली फुले मधुमेहावर; बिया मूत्रविकारांवर; पाने शूलावर (तीव्र वेदनांवर) उपयुक्त व आरोग्य पुनःस्थापक (पुन्हा आरोग्य प्राप्त करून देणारी) असतात.

वेदना आराम – अशोक वृक्षात फ्लेव्होनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळतात. या संदर्भातील संशोधनात असेही नमूद केले आहे की फ्लेव्होनॉइड्सची उपस्थिती दाहक-प्रतिरोधक, अँटीपायरेटिक (ताप-निवारक प्रभाव) आणि वेदनशामक (वेदना कमी करणारे) गुणधर्म प्रदर्शित करते.

अशोक वृक्षाचे तोटे :

अशोकाचे हे सर्व गुणधर्म असूनसुद्धा त्याचे काही तोटेही आहेत. अशोकाच्या झाडाच्या नुकसानीबद्दल बोलणे, औषधी प्रमाणात घेतल्याने कोणतीही हानी होत नाही, परंतु काही प्रकरणांमध्ये ते न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, ज्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत.

पाळीच्या अनुपस्थितीत, त्याचे सेवन केल्याने परिस्थिती अधिक खराब होऊ शकते. गर्भवती महिलांनी त्याचे सेवन करू नये. उच्च रक्तदाब समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्या.

असा हा अध्यात्मिक व पौराणिक वृक्ष विशेषतः सीता अशोक हा प्रत्येकाने आपल्या बगिच्यात लावला पाहिजे.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

संदर्भ :
लोकसत्ता टीम – मार्च १५,२०१६, चारुशीला जुईकर ,
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
लेखक : सी. ना. गाडगीळ, शं. आ. परांडेकर माहिती स्रोत : मराठी विश्वकोश  

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 75 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ८ – अशोक वृक्ष

  1. लेख आवडला, सिता अशोका चे झाड, अभावानेच दिसते,पण तेचं फुलांनी बहरलेल असताना सुंदर दिसते. हिरवा अशोक मात्र बर्याच ठिकाणी दिसतो. बहुधा हिरवा अशोक आखुड व उंच वाढतो हे कारण असावं.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..