नवीन लेखन...

अंदमान यात्रा दैनंदिनीचे पान

दुपार झाली.रात्रीचे जागरण झाले होते तरी सर्वजण उत्साहात होते.बस आता सेल्युलर जेल च्या दिशेने निघाली होती.भोवतालचा परिसर निसर्गरम्य होता.मधेच कुठे वळणावर दिसणारा समुद्र शांत असल्याचे जाणवत होते.त्याचे भयकारी स्वरूप कसे असेल.मला त्सुनामी आठवली.पण यावेळी तिची आठवणही मी दूर भिरकावली.

समोर सेल्युलर जेल अक्षरे दिसू लागली. जेलचे भक्कम दारातून आत शिरलो.त्या भिंती जणू आमची वाट पाहत असाव्यात. ते स्वागत होते स्वतंत्र भारतात जन्मलेल्या भारतीयांचे.पण स्वातंत्र्यपूर्वी जन्मलेली एक व्यक्ती आमच्या सोबत होती खरी.

तिचा जन्म 47 पुर्वीचा.अर्थात दोन सूर्योदय तिने पाहिले होते.स्वातंत्र्यापूर्वीचा व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चा.

पण येथे मात्र गजाआडचे यातनामयी जीवन त्या क्रांतिकारकांनी अनुभवले होते.दरवाजाजवळ एक प्रदर्शनी दिसेल.येथे त्या क्रांतीकारकांची माहिती मिळेल.ज्यांनी येथे यातना सहन केल्या.समोर दिसणारी ती पेटती मशाल क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण करून देणारी.अनेक जहाल क्रांतीकारक युवकांच्या बलिदानाची ती आठवण.जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात जीवाची तमा न बाळगता या तरुणांनी मृत्यूला कवटाळले.वंदे मातरम हे शब्द माझ्या मुखातून निघाले. व त्या अखंड तेवणाऱ्या ज्योतिसमोर मी नतमस्तक झालो त्याचवेळी एक पिंपळ पान भिरभिरत अंगावर आले.हाच तो वयोवृद्ध पिंपळ.क्रांतिकारकांच्या यातनांचा मूक दर्शक.जाज्वल्य देशभक्तीनें हसत हसत फासावर गेलेल्या किती तरी तरुणांच्या फाशीचा साक्षीदार.तो ही या क्रूर यातना बघताना हळहळला असेल. आज तो शांत दिसत असला तरी कितीतरी गोष्टी त्याच्या पोटात दडलेल्या.

हाच तो सेल्युलर जेल!तीन मजली विशाल उंच भिंतीमध्ये कैद्यांनी केवळ मरण यातना अनुभवल्या. लहानशा या कुलूपबंद खोल्यात घालवलेला हा यातनांचा प्रवास!हा समोरचा चबुतरा.येथे कैद्याला अखेरची आंघोळ घातली जात असे.आणि नंतर त्याला वधस्तंभाकडे नेले जाई. ही समोरची खोली त्या अनेक मरणाची मूक दर्शक.पूर्वी कदाचित तेथे फाशी देण्याची मोकळी जागा असेल.मृत्यूपूर्व अखेरचा श्वास घेताना एखाद्या कैद्यांची आर्त किंकाळी किंवा लपटणारे शरीर तर कधी वंदे मातरमचा जयघोष सर्व त्या अश्वस्थाला ठाऊक!

कैद्यासाठी हे बंदी गृह बांधले तेव्हा त्यांचा जेलर होता डेविड बारी.पण तेथे आलेला हा कैदी सामान्य नव्हताच. याच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप होता.जेलच्या उंच भिंती याच्या विचारांना भेदून जाऊ शकणाऱ्या नाही .प्रतिभेला रोखू शकणाऱ्या नाहीत.

मत ठासून भरलेली राष्ट्रभक्तीची भावना मरणाला न भिणारी!५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ऐकल्यावरसुद्धा चेहऱ्यावर कुठलेही भय नसलेला हा युवक म्हणजे विनायक दामोदर सावरकर! कारागृहाच्या खोलीसमोरून पावले चालत असतात.आणि कारागृहाच्या भिंती मुकपणाने इतिहास बोलका करतात.आपण त्यापुढे नतमस्तक व्हायचे.त्या खोल्यांचे गज आता जीर्ण झाले आहेत.काही तुटले सुद्धा आहेत.जीर्ण झालेल्या ह्या गजांच्या काही आठवणी आहेतच.स्वतंत्रतेचे गीत ओठांवर गात येणारा हा निर्भीड तरुण कोण असेल असे त्यांनाही क्षणभर वाटले असेल हिच ती खोली.याच खोलीत विनायकाची प्रतिभा बहरून आली होती.दिवसभर आसूड व यातना.कोलू फिरविताना झालेला त्रास विसरून या तरुणाला कशी सुचतात स्वतंत्रतेची स्तोत्रे.त्या अंधारल्या खोलीत कमला ह्या खंडकाव्याच्या ओळी स्मरतात ती व्यक्ती सामान्य असूच शकत नाही.क्षणभर खाली बसलो.सर्वानी जयोस्तुते हे गीत गायले.सावरकरांनी लिहिलेल्या आणखी एक कवितेची ओळ आठवली.

अनादी मी अनंत मी अवध्य मी भला मारिन रिपु मजशी असा कवण जन्मला ही ब्रिटिशांना ठणकावून सांगणारा हा तरुण क्रांतीकारक होता.विनायक दामोदर सावरकर! ज्यांचे जीवन म्हणजे देशभक्ती.चिंतन म्हणजे देशभक्ती स्मरण,वाचन लेखन काव्य म्हणजे म्हणजे देशभक्ती.प्रकाशाचा दृक्श्राव्य कार्यक्रम संपला.डोळ्यात पाणी आणि हृदयात सावरकर घेऊन परतलो.धन्य ती माऊली!जिने ह्या पुत्रांना जन्म दिला.

मुकुंद हरिहर देशपांडे, वर्धा

आम्ही साहित्यिक चे लेखक

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..