नवीन लेखन...

आंदोलन नव्हे, प्रतियोगिता परीक्षांची तैयारी करा

आज महाराष्ट्रात आरक्षण- आरक्षणचा आरडा-ओरडा सुरु आहे. जणू काही आरक्षण जाहीर होताच समाजातील सर्व तरुणांना सरकारी नौकर्या मिळणार. आरक्षण मिळाले तरी फक्त काही हजार लोकांनाच नौकरी मिळणार. ती पण त्यांनाच जे सरकारी नौकरी साठी तैयारी करतील.  हुशार तरुण डॉक्टर, अभियंता, आर्किटेक्ट इत्यादी बनतात. काही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या प्रशासनिक सेवेची तैयारी करतात. सामान्यतः ५० ते ६०% टक्के  आणणारे सामान्य बुद्धीचे तरुण सरकारी नौकरी साठी प्रयत्न करतात.

आज सकाळी सहज केंद्र सरकारच्या CSSS (स्टेनो सर्विस- एकूण  संख्या ७०००, CSCS क्लरीकल सर्विस ५५०० च्या जवळ व CSS – 12000 च्या जवळपास, मराठी नावे शोधण्याचा प्रयत्न केला. देशात मराठी  बोलणार्यांची संख्या ८ टक्के असली तरी हि १ टक्क्याहून कमी मराठी भाषिक केंद्रसरकारच्या वरील नौकरींत आहे. आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही श्रेणीत  दारूण परिस्थिती. १८ वर्षे प्रधानमंत्री कार्यालयात होतो, तिथे ६० च्या वर CSSS कॅडरचे कर्मचारी होते, त्यात मी एकटाच मराठी भाषिक या कालखंडात.इतर सरकारी नौकर्या, उदा. सरकारी बँक, रेल्वे, डिफेन्स, इत्यादी, तिथेही बहुतेक हीच परिस्थिती असणार. सर्व सरकारी क्षेत्र मिळून  दरवर्षी किमान ३० ते ४० हजार नौकर्या, (एमटीएस, क्लार्क, स्टेनो, डाटा एन्ट्री आॅपरेटर, पीए, ASO इत्यादी गैर-तकनिकी  पदांसाठी) निघत असेल. देशात राहणारा कुणी हि या परीक्षा देऊ शकतो.

काही सौपी असलेल्या परीक्षेंचे उदाहरण.  क्लार्कच्या परीक्षेचे घ्या – सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धी, सामान्य गणित आणि सामान्य आंग्लभाषा. पास झाल्यावर टायपिंगचा पेपर, एवढेच. पगार हि  सुरवातीला  किमान 25 हजारापेक्षा जास्त. १२वीत जर जास्त मार्क्स आले नसेल तर कालेजच्या शिक्षणासोबत प्रतियोगी परीक्षांची क्लास लाऊन घ्या. (अधिकांश बिहारी तरुण हेच करतात). आज आनलाईन SSC परीक्षांची प्रश्नोत्तरे उपलब्ध आहेत. घरी हि अभ्यास करता येतो. नियमित वर्षांचे ३६५ दिवस  नौकरी लागेपर्यंत अभ्यास करा. कुठे न कुठे सरकारी नौकरी अवश्य लागेल, कुठल्याही आरक्षणाशिवाय.

स्टेनोग्राफर- हि तर पास करायला सर्वात सौपी. फक्त सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धी आणि सामान्य आंग्लभाषा. लिखित परीक्षा  हि  सौपी असते.  तृतीय श्रेणी साठी फक्त  ८० ची स्पीड  (सुरवातीचा पगार ३० हजारच्या जवळ) आणि श्रेणी ‘बी’- सौपी लिखित परीक्षा + १००ची स्पीड (सुरवातीचा किमान पगार ४० हजार पेक्षाही जास्त). स्टेनोग्राफरची  परीक्षा पास होण्यासाठी फक्त चिकाटी लागते. या परीक्षेसाठी फक्त ज्या दिवसापासून स्टेनोग्राफी शिकणे सुरु  करणार ते जो पर्यंत नौकरी लागत नाही नियमित न चुकता अभ्यास करावा लागतो. आज अभ्यासासाठी आनलाईन  फ्री ड़िक्टेशन उपलब्ध आहेत. चिकाटीसाठी म्हणाल तर मला आठवते श्रेणी बीच्या विभागीय परीक्षेसाठी जून १९९३ मध्ये क्लास सुरु केली, पहिल्यावर्षी  ध्यान भंग झाल्यामुळे ड़िक्टेशन व्यवस्थित घेता आले नाही. दुसऱ्यावर्षी पास झालो.  स्कील परीक्षा  जून १९९५ मध्ये झाली. निकाल डिसेंबर १९९५ मध्ये आला तोपर्यंत क्लास सोडली नाही. सकाळी ६ ला घरून निघायचो, क्लास करायची, कार्यालयात रोज ओवरटाईम हि न चुकता करायचो व संध्याकाळी ९ नंतरच घरी. या काळात दिल्ली सोडून कुठेही गेलो नाही. आज राजपत्रित अधिकारी. तुम्हाला आंग्लभाषा येत नाही (मी तर ग्रेस मार्कांनी पास झालो होतो), सामान्य ज्ञान इत्यादी हि चांगले नाही. फक्त नियमित अभ्यास करा, सामान्य बुद्धीचा तरुण हि स्टेनोग्राफीचा पेपर सहज पास करू शकतो.

जन्मापासून दिल्लीत रहात असलो तरी महाराष्ट्रात जावेच लागतेच. एकदा नागपूरला गेलो असताना सहज नाक्यावर उभ्या काही तरुणांशी चर्चा केली.  बहुतेक मराठी तरुण सरकारी परीक्षांची तैयारी करतच नाही. काही तरुण  कालेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सरकारी नौकरीचा विचार करतात. फार्म भरल्यानंतर ३-४  महिन्यांच्या अर्धवट तैयारीवर, परीक्षा पास करण्याचे स्वप्न बघतात, जे संभव नाही. मग सुमार बुद्धीचे इतर भाषिक परीक्षा पास होतात आणि हुशार मराठी तरुण, पूर्ण व नियमित तैयारी नसल्यामुळे, असफल होतात. कारण स्पष्ट आहे, १२वी पासूनच प्रतियोगी परीक्षांसाठी नियमित अभ्यास केल्याने त्यांचे सामान्य ज्ञान व आंग्ल भाषेचे ज्ञान वाढले असते. आत्मविश्वास हि भरपूर  वाढलेला असतो. अधिकांश पहिल्या प्रयत्नांत पास होतात. बाकी तीन-चार प्रयत्नात सरकारी नौकरीचा पेपर पास करतातच. समजा सरकारी नौकरी नाही मिळाली तरी निजी क्षेत्रात त्यांना चांगल्या पगाराची नौकरी मिळतेच.

सांगायचे एवढेच, आरक्षण असो किंवा नसो, जर सरकारी परीक्षेची तैयारीच कुणी करणार नसेल तर त्याला नौकरी कुठून लागणार. पण महाराष्ट्राचे दुर्भाग्य, कुठलाही नेता, तरुण मुलांना परीक्षेची तैयारी करण्याची प्रेरणा देत नाही. आंदोलनांवर पैसा खर्च करण्याएवजी चांगले कोचिंग क्लास्सेस उघडणे, परीक्षेसाठी तरुणांना नियमित अभ्यासाची प्रेरणा देण्याचे कार्य केले तरी दरवर्षी काही हजार मराठी तरुणांना सरकारी नौकरी निश्चित  मिळेल.आता निवडणूक जवळ येत आहे. अनेक जातींचे नेता राजनीतिक पोळी भाजण्यासाठी, बेरोजगार तरुणांचा उपयोग करतील. तरुण मुले हि मूर्खान्सारखी त्यांच्या मागे धावतील.  पदरात काही पडणार हि नाही.

शेवटी माझे म्हणणे एकच आहे, १२वी होताच, नियमित ३६५ दिवस सरकारी नौकरींच्या परीक्षेची तैयारी करा. त्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी लागेल.  सार्वजनिक उत्सवांमध्ये वाजवीपेक्षा जास्त भाग घेणे, विडी, तंबाकू इत्यादी नशापाणी हि सोडावे लागेल. आजच्या तरुणांचे मुख्य व्यसन फेसबुक व व्हाट्सअप इत्यादी पासून हि दूर राहावे लागेल. एवढेच केले तरी, ग्रेजुएट होताच पहिल्या काही प्रयत्नातच सरकारी नौकरी किंवा निजी क्षेत्रात जिथे ९० टक्के नौकर्या आहेत, चांगली नौकरी निश्चित लागेल.

— विवेक पटाईत 

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..