अँडी रॉबर्ट्स यांचा जन्म २९ जानेवारी १९५१ रोजी उर्लिंग,अँटिगा येथे झाला.
चार-चार तेज गोलंदाजांचा तोफखाना घेऊन खेळण्याचे वेस्ट इंडियन तंत्र अँडी रॉबर्ट्स यांच्यापासूनच सुरू झाले होते.
अँडी रॉबर्ट्स यांचे बाउन्सर सर्वाधिक धोकादायक समजले जात असत. बाउन्सरच्या आधीचा चेंडूही काहीसा उसळे, पण तो मऊ भागावर आपटवला जाई. पुढील चेंडू मात्र सीम किंवा शिवणीवरून उसळायचा आणि फलंदाजाची भंबेरी उडायची. अत्यंत चतुर गोलंदाज ही त्यांची ख्याती होती.
आपल्या ४७ कसोटी सामन्यांमध्ये अँडी रॉबर्ट्स यांनी २०२ विकेट्स घेतल्या.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply