नमस्कार वाचकहो,
आणि अचानक त्या वळणावर ही माझी रोमांचक भयकथा आता समाप्त झाली.
निशा आणि रोहनच्या जंगलातील या प्रवासात आपण माझ्याबरोबर चालत होतात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
वाचकांनी कथा आवडल्याच्या प्रतिक्रिया खूप मोठ्या संख्येने नोंदवल्या. निशा रोहनच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली….. त्यांच्या प्रवासात माझ्याबरोबर तुम्हीही एकरूप झाला होतात…
पण ही कथा फक्त निशा आणि रोहनची नाहीये….
असे आपल्या परिचयातले अनेक निशा आणि रोहन अचानक गेलेले असतात.
असंच कोणीतरी आपलं माणूस… आपला नातेवाईक…
मित्र-मैत्रिण…. सहकारी…एखादी प्रसिद्ध व्यक्ती….आपला शेजारी यापैकी कोणीनाकोणी
अशा अचानक घडलेल्या अपघातात दगावतात आणि आपल्याला सोडून जातात.
आपलं त्यांच्याशी किती जवळचं नातं आहे
त्यावर त्या घटनेबद्दल वाटणार्या दुःखाची तिव्रता व्यक्तीसापेक्ष असते…..
अशा घटना/अपघात घडताना आपण रोजच बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो…..
ती व्यक्ती गेल्यानंतर आपण नेहमीच पाहत असतो….
त्या व्यक्तीच्या माघारी राहणारे त्यांचे नातेवाईक यांच्यावर किती प्रकारे वाईट प्रसंग येतात….
एखाद्या कर्त्या व्यक्तीच्या जाण्याने एखादे घर पूर्ण कोलमडून पडते….
एखाद्या वृद्ध आईवडिलांचा आधार या अपघातात निघून जातो…..
आपण प्रत्यक्ष भेटून, फोनच्या माध्यमातून त्यांचं सांत्वन करतो.
शक्य असेल तेवढी मदत आपण त्यांना निश्चितच करत असतो…..
पण त्या व्यक्तीच्या नसण्याची पोकळी आपण खचितच भरून काढू शकत नाही…..
अपघाताच्या कारणांची वेगवेगळ्या स्तरातून चर्चा होते….
हळहळ व्यक्त होते….
वाहन चालकाच्या बेफिकीरीला नावं ठेवली जातात…
रस्त्यांना नावे ठेवली जातात……
वाढत्या ट्रॅफिकच्या नावाने बोटे मोडली जातात….
मृताच्या नातेवाईकांना अनेक अनाहुत सल्ले दिले जातात….
पण व्यक्तीशः आपण…..आपण….असं कुणाच्याच बाबतीत परत होवू नये म्हणून काय करतो?
या कथेच्या निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत….
कथेच्या शेवटी उल्लेख केल्याप्रमाणे निशा आणि रोहनच्या
मृत व्यक्तिंच्या या नव्या कुटुंबात, आणखी कुणी नवीन सामील होवू नये म्हणून ते काय उपयायोजना करावी याचा विचार करताहेतच….
पण तुम्हाला वाटतं?
हे आपल्या बाबतीत कधीच घडू नये म्हणून तुम्ही स्वतः काय काळजी घ्याल?
तुमच्या मुलांना काय शिकवण द्याल?
त्यांनी जबाबदारीनं वागावं म्हणून तुम्ही काय कराल?
सार्वजनिक ठिकाणी वावरताना, गाड्या चालवताना, तुम्ही स्वतः कोणते नियम पाळाल?
आणि…. बरंच काही….
मला हे आपणां सर्व वाचकांकडून जाणून घ्यायचं आहे…..
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत……..
©✍️ संध्या प्रकाश बापट.
Leave a Reply