नवीन लेखन...

ज्येष्ठ संगीतकार व संगीत संयोजक अनिल मोहिले

‘श्रावणात घननिळा बरसला’ या गाण्यातील गोडवा अथवा ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीये’ या गाण्यातील ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचे कसब लाभलेले अनिल मोहिले यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. त्यांना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि तरंगवाद्याचं बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळाली. रूपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच १९६० च्या दशकात त्यांनी आकाशवाणीवर काम केलं. संगीतसंयोजनाची सुरुवात त्यांनी आकाशवाणीवर केली. तेथेच त्यांच्या आयुष्यातील नवे लक्ष्य मिळाले आणि ते शास्त्रीय संगीतापासून भावसंगीताकडे वळले. संगीत संयोजनासाठी शिवकुमार पुंजाणी यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन घेतले. नोटेशन वाचून वाजवणं हा प्रकार ते त्यांच्याकडे शिकले. आकाशवाणीवर श्रीनिवास खळे यांची ओळख झाली. नोटेशन लिहिणं, चालीमधल्या जागा गीताच्या चालीला अनुरूप अशा धूनांनी भरणं यासाठी लागणारं ज्ञान त्यांना श्रीनिवास खळे यांच्याकडून मिळाले. ते स्वतः बुलबुल तरंग आणि मेंडोलिन वाजवायचे. स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी ही आवड जोपासली होती. वयाच्या सातव्या वर्षी आकाशवाणी मुंबई केंद्रावर त्यांचा ‘गंमत जंमत’ या मुलांच्या कार्यक्रमात एकल तबलावादनाचा कार्यक्रम सादर झाला होता.

जलतरंग, बुलबुलतरंग, व्हायोलिन, मेण्डोलिन यासारख्या वाद्यांवर कमालीचे प्रभुत्व असणाऱ्या मोहिले यांनी सुमारे ४० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत सचिनदेव बर्मन, खय्याम, कल्याणजी-आनंदजी, भप्पी लाहिरी यासारख्या अनेक संगीतकारासोबत त्यांनी संगीत संयोजक तसेच सहाय्यक संगीतकाराची भूमिका पार पाडली. त्यांच्यावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता. ८६ हिंदी चित्रपटांचे त्यांनी संयोजन केले आहे. जवळपास ७० हून अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केले. लता मंगेशकर यांच्या देश-विदेशातील सर्व संगीत मैफलींमधील संगीत संयोजनाची जबाबदारी मोहिले यांनी अनेक वर्षे सांभाळली होती. इंडस्ट्रीत माझं स्थान पक्कं करण्यात लतादीदींची बहुमोल मदत झाली. किंबहुना त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आजतागायत घट्ट पाय रोवून आहे, असे अनिल मोहिले नेहमी म्हणायचे.

अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडीने संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आहेत.त्यानंतर अनिलजींनी स्वतंत्रपणे संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. मंगेशकर कुटुंबीयांचा उजवा हात अशी त्यांची प्रसिद्धी होती. संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रमही सन २००३ पासून मोहिले यांनी राबविला. तीन पिढ्यांच्या संगीतकारांना जोडणारा दुवा म्हणून अनिल मोहिलेंकडे पाहिले जात होते. मुंबई विद्यापीठात संगीत संयोजनाचा अभ्यासक्रमही त्यांनी सुरु केला होता. त्यातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. थोडीसी बेवफाई, कयामत से कयामत, लेकिन, शराबी, डॉन, अभिमान यांसह ८६ हिंदी चित्रपटांचे संगीत नियोजन त्यांनी केले होते. शुभमंगल सावधान, दे दणादण, थरथराट यांसह अनेक मराठी चित्रपटांचेही संगीत नियोजक तेच होते. अनिल मोहिले यांचे निधन १ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..