अन्नपूर्णा दारातून म्हणाली
भाकरी दे माई |
मी म्हणाले भाकरी नाही
ब्रेड देवू कां बाई ||१||
ती म्हणाली भाकरीची चव
ब्रेडला येणार नाही |
मला मात्र भाकरी करायला
वेळच नाही ||२||
एन्जॉयमेंट मधून मला
खरं सवडच नाही |
ब्रेडपेक्षा भाकरी मला
परवडत नाही ||३||
रागावू नकोस तू
जा पुढच्या दारी
हीच रीत बघशील तू
सध्या घरोघरी ||४||
अन्नपूर्णा म्हणाली
बरंय मी येते-
त्याक्षणी झाले माझे
भरले घर रिते ||५||
Leave a Reply