संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या५साठी साप्ताहिक ‘नवयुग’ कमी पडू लागले म्हणून शिवाजी पार्कच्या सभेत मे १९५६ मध्ये सेनापती बापट यांनी आचार्य अत्रे यांना सुचवले की, लढा यशस्वी करायचा असेल तर एक दैनिक सुरू करा. आचार्य अत्रे यांनी घोषणा केली, ‘१५ नोव्हेंबरपासून ‘मराठा’ नावाचे दैनिक सुरू करेन.’ आणि १५ नोव्हेंबर १९५६ ला दैनिक ‘मराठा’चा पहिला अंक प्रकाशित झाला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ‘नवयुग’ आणि ‘मराठा’मधून आचार्य अत्रे यांनी अक्षरश: घणाघात केला होता. आज दैनिक ‘मराठा’ चालू असता तर त्याचा ६४ वा वाढदिवस साजरा झाला असता.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply