पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १० मार्च १९५९ रोजी पवई मध्ये या संस्थेची सुरुवात केली. ही भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था आहे जिला परदेशातील मदतीने उभारण्यात आली. या साठी युनेस्को कडून रशियन रूबेल्स च्या स्वरूपात निधी मिळवण्यात आला होता. १९६१ मध्ये ह्या संस्थेस राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असा दर्जा देण्यात आला. तेंव्हा पासून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही उत्तरोत्तर वाढून जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आली आहे.
आय आय टी पवई ही संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई संस्थेची मुख्य इमारत मुंबईच्या पवई ह्या उपनगरात संस्था वसली आहे. मुंबईच्या मध्यभागही असूनही निसर्गाच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे राहणाऱ्यांना शहरी जीवन व निसर्गरम्य जीवन अनुभवता येते. हा परिसर पूर्णतः रहिवासी असल्यामुळे, सर्व विद्यार्थी हे एकूण १५ वसतिगृहांमध्ये राहतात, ज्यामध्ये जेवणाची उत्तम सोय उपलब्ध आहे. परिसरात खेळाच्या व इतर क्रियांसाठी उत्तम मैदाने व सुविधा उपलब्ध आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply