कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह १५ ऑक्टोबर १९१५ रोजी सुरु झाले. महापालिकेच्या अखत्यारित असलेले केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वी पॅलेस थिएटर म्हणून ओळखले जात होते. राज्यातील एक प्रसिद्ध नाट्यगृह म्हणून ओळख होती. या नाट्यगृहाचे दोनदा नुतनीकरण झाले होते. त्यानंतर वेळोवेळी केलेल्या बदलांमुळे मूळ स्वरुप लोप पावले होते. त्यामुळे २०१३ मध्ये नाट्यगृहाचे मूळ रुप जपत नुतनीकरण करण्याचे महापालिकेच्यावतीने ठरवण्यात आले होते. त्यानुसार मार्च २०१३ ते एप्रिल २०१५ या कालावधीत नुतनीकरण करण्यात आले. त्यासाठी आर्किटेक्ट जाधव यांनी आराखडा तयार केला. यामध्ये यापूर्वी केलेल्या नुतनीकरणातील खटकणाऱ्या अनेक गोष्टी दूर करत ऐतिहासिक बाज जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी नाट्यगृहाच्या दगडी इमारतीचा वापर व्यवस्थित करुन लाकडी कामामुळे जुना लूक कायम ठेवण्यात यशस्वी झाले.
२०१७ मध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान या प्रकल्पाला जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इटलीमधील ए डिझाइन अॅवॉर्ड अँड स्पर्धेमधील ‘ए डिझाइन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नाट्यगृहाच्या नुतनीकरण प्रकल्पाला येथील आर्किटेक्ट सुरत अंजली असोसिएशनला कल्चरल हेरिटेज आणि कल्चरल इंडस्ट्रियल डिझाइन या विभागात हा पुरस्कार मिळाला आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply