२४ मार्च १९९१ साली कोकणातील लेखक कवी मधु मंगेश कर्णिक यांनी एक व्यासपीठ म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थारना केली. आज ही संस्था वटवृक्षासारखी सुमारे ६० शाखांमध्ये विस्तारली आहे. ठाणे जिल्हयात यापैकी ६ शाखा कार्यरत आहेत. कोमसापच्या सर्व शाखांतर्फे दरवर्षी स्थापना दिवस विविध कार्यक्रम करून साजरा केला जातो.
कोकणातील आवाज,लेखणी महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी असलेलं हे व्यासपीठ..
स्थापनेपासून गेली एकतीस वर्षे आजवर अनेक साहित्यिकांनी आपले योगदान यराठी साहित्यात आणि या संस्थेतही दिले..
मुंबई ते सिंधुदुर्ग पर्यंत व्यापलेली कोमसाप जिच्या पाशी तिची स्वतःची युवाशक्ती आहे..
गेली एकतीस वर्षे या युवाशक्तीची घोडदौड सुरु आहे.युवाशक्तीच्या माध्यमातून अनेक युवक साहित्याशी जोडले जात आहेत आणि विविध क्षेत्रात कार्यरत होत आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply