
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना २३ डिसेंबर १९७७ रोजी झाली.
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी ऊर्जा कंपनी आहे. २०१७ वर्षाच्या तुलनेत रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदा पाच स्थानांची झेप घेतली आहे. आता रिलायन्सच्या पुढे रशियाची गॅस कंपनी गेजप्रॉम आणि जर्मनीची ई. ऑन या दोन कंपन्या आहेत. प्लॅट्स संस्थने जागतिक ऊर्जा क्षेत्रातील २५० कंपन्यांची क्रमवारी असलेली एक यादी तयार केली आहे.
या यादीत भारत सरकारचा उपक्रम असलेली इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनी पहिल्या दहा क्रमांकामध्ये सातव्या स्थानावर स्थानापन्न आहे. तसेच ओएनजीसी अर्थात ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या अन्य सरकारी कंपनीला या यादीत ११वे स्थान मिळाले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply