आज पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस.
सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात १ जानेवारी १९३२ रोजी सुरू केले.
१९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आहे. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे. वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यम समूह झालेला आहे.
नव्या-जुन्या पिढीतील वाचकांचे “सकाळ’ला भरभरून प्रेम मिळत आहे. दैनिक किंवा साप्ताहिकच नव्हे, तर “साम वाहिनी’, “ई-सकाळ’ आणि इतर “सोशल मीडिया’च्या माध्यमातूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाचक “सकाळ’शी जोडला गेलेला आहे. वाचकांच्या प्रतिसादामुळेच “सकाळ’ ही वाटचाल करत आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply