(एनआयओ) अर्थात राष्ट्रीय सागरशास्त्र/समुद्र विज्ञान संस्था चे मुख्यालय डोना पॉला, गोवा येथे समुद्र किना-यापासून जवळ वसलेली असून , केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ( सीएसआयआर) च्या अंतर्गत असलेल्या ३७ प्रयोशाळांपैकी एक आहे . १९६० च्या दशकात आंतरराष्ट्रीय हिंद महासागर मोहिमेनंतर (आयआयओई) सागर विज्ञानाचे महत्व जाणून सीएसआयआर द्वारा एनआयओ ची स्थापना संस्था १ जानेवारी १९६६ मध्ये स्थापन झाली .
आता या संस्थेची कोची, मुंबई आणि विशाखापट्टनम येथील प्रादेशिक केंद्रे, असून अंतरराष्ट्रीय स्थरावर एनआयओ महत्वाची समुद्र विज्ञाना तील अग्रेसर संस्था आहे . जीव , रसायन , भौतिक , सूक्ष्म जीव आणि भूगर्भ समुद्र शास्त्र विषयातील स्वतंत्र विभाग असून भारताच्या इंडियन ओशेंन क्षेत्रातील समुद्र भागात होणाऱ्या सर्व जैविक, भौतिक, रसायनिक घडामोडीवर लक्ष ठेऊन येथे संशोधन आणि इतर कार्य होते. आपल्याला समुद्र उपयोगी कसा होईल याबाबत एनआयओ संशोधन करते.
संस्थेच्या गोवा मुख्यालयात तसेच प्रादेशिक केंद्रांवर अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. यामध्ये आर.व्ही. सिंधू संकल्प आणि आर.व्ही. सिंधू साधना ही दोन जहाजे समुद्रात संशोधन आणि निरीक्षणासाठी सर्व सुविधा असलेली दोन जहाजे एनआयओ तर्फे कार्यरत आहेत. संस्थेच्या प्रशस्थ ग्रंथालयात सागरशास्त्रातील १५००० पेक्षा जास्त पुस्तके असून सागरशास्त्राविषयी प्रकशित होणारी मानक संशोधन जर्नल्स उपलब्ध आहेत या शिवाय ही जर्नल्स ऑन लाइन वाचण्याची सुविधा ही कार्यरत आहे.
अशा सागर विज्ञानात बहुआयामी संशोधन करून भारताचे नाव जगात उंचवणा-या गोव्यात व पणजीत आल्यास अवश्य भेट द्या.
Leave a Reply