शांत नितळ सागरातलं वादळ तसा तुझा बासरीचा सूर..
घनगंभीर तरी मोहक, व्ययातील तारकामंडलाला व्यापणारा…
कोटी स्वर भास्करांचा महामेरू सहज पेलणारा…
कित्येक युगांची तृषा जागवणारा…
माझ्या स्पदनांनी ही अंतराय निर्माण करणारा…
मंञमुग्ध करणं ही जादूगिरी तुझी..
त्या अनवट स्वरांवर अलवार हींदोळे
घेणं भाग्य जन्मांतरीच…
कुठे शोधायचं तुला?कसं रोखायचं स्वतः ला..?
पापण्यांचे कवडसे एकदा तरी खुले कर….
प्रत्येक वेळा मीच का हृदयात बंदीस्त करायचं तुला..?
सौ.लीना देशपांडे.
29/7/18-10.30