नवीन लेखन...

अंतर्मन अधिक महत्वाचं

व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी, मानसिकता ही देखील भिन्न असते. ह्या भिन्न विभिन्न मानसिकतेचा विचार करून कुटुंबामध्ये एकता निर्माण करावी लागत असते. आपल्यासाठी आपलं सुप्तावस्थेत असणारं अंतर्मन अधिक महत्वाचं असतं. आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहारांचा थेट परिणाम आपल्या अंतर्मनावर होत असतो.

विचार, वर्तन आणि व्यवहार सकारात्मक पातळीवर अंतर्मनावर कोरले गेले तर यशप्राप्ती सहज साध्य आणि शक्य होत असते. याउलट नकारात्मक विचार, वर्तन आणि व्यवहार या सर्वांमुळे अंतर्मनाला दु:ख आणि एकूणच आपल्या वाट्याला अपयश येतं. आपल्या दृष्टिकोनावर आपले अनुभव संचित होत असतात. हे अनुभव सुख-दु:खाचे म्हणजेच संमिश्र स्वरूपाचे असतात. प्रत्येकाच्या विचारांप्रमाणे आवडी-निवडी, अपेक्षा, गरजा, शारीरिक व्यक्तिमत्व हे निराळं असतं. त्याप्रमाणे त्याला साजेसं, शोभेल असं घरातील वातावरण असणं अथवा ते निर्माण करणं निश्चितच उपयोगाचं ठरतं.

अनेकदा दु:ख अधिक आणि सुख मात्र अगदी थोडं आपल्या वाट्याला आलं असल्याचं म्हंटलं जातं. खरं तर, जसा चष्मा लावावा तसंच दिसतं. प्रत्येक विषयाकडे आपण कसं पाहतो त्यानुषंगाने आपलं वैचारिक मंथन सुरु होत असतं. सर्वप्रथम बाह्यमन त्याचा विचार करायला लागतं आणि त्याच वेळी आपल्या सुप्त अंतर्मनावर प्रत्येक विषय प्रतिबिंबित होत राहतो. मग क्रिया आणि प्रतिक्रियांचा खेळ सुरु होतो.

अंतर्मनावर प्रतिबिंबित झालेले प्रत्येक विचार आपल्या वर्तन आणि व्यवहारांमध्ये परिवर्तन करत राहतात. अनेकदा मनांत येणारे विचार आपल्या गत अनुभवांशी निगडीत असतात तर ते काहीवेळा नजीकच्या भविष्यात काय, कसं आणि कधी घडावं ? याबद्दलचे असतात. आयुष्याच्या अवघड शाळेत आपण कोणत्या वर्गात आहोत, परीक्षा कोणती आहे हे ठाऊक असतंच असं नाही; कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.

– विद्यावाचस्पती विद्यानंद

ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..