नवीन लेखन...

अंतरपाट (लघुकथा)

लग्न घटिका जसजसशी जवळ येऊ लागली तसतशी सगळ्यांच्या उरातली धडधड नाहकच वाढली.

मुलाच्या व मुलीच्या मामांनी वर -वधूच्या मधोमध अंतरपाट धरला होता. 

मधे अंतरपाट धरताच कालींदी भुतकाळात रमली. कालच तिनी आपल्या बाबांना सांगितलं की ,मी माझा वर सुनिश्चित केला आहे आणि आम्ही उद्या विवाह बद्ध होणार आहोत. तुम्ही आणि आई  ,दोघही कोर्टात माझ्या बरोबर चला.कार्तिकचे आई-बाबा पण येणार आहेत.

कालिंदिचे बाबा एकंदरीत पार्श्वभुमी ऐकून अवाक झाले.एकुलती एक ,उच्चशिक्षित मुलगी.

त्यांना तिचं लग्न धुमधडाक्यात करायचे होते. स्वत:च्या हौसेला बगल देत ,त्यांनी कार्तिकला घरी आमंत्रित केले. मी तुमच्या विवाहाला विरोध करित नाही.पण माझी एकच विनंती आहे की आपण हा विवाह सोहळा विधिवत पार पाडू.

कालिंदी व कार्तिक ने सहमती देताच एका दिवसात फोनवर आमंत्रण,सभागृहाचं आरक्षण व बाकी सगळ्या तरतूदी पुर्ण झाल्या.

साखरपुडा,श्रीमंती,लग्न,रिसेप्शन एकाच दिवसात पार पाडायचं ठरलं.ज्यांना ज्यांना शक्य होत त्यांनी त्यांनी लग्नाला हजेरी लावण्याचं आश्वासन दिलं.

ठरल्याप्रमाणे सगळे आमंत्रीत लग्नाला हजर होते.देणं घेणं पार पडलं.पहिला कार्यक्रम साखरपुड्याचा. वर-वधू सभामंडपात येताच एकच जल्लोष झाला.विधिवत साखरपुडा पार पडल्यानंतर श्रीमंतीची लगबग सुरू झाली.कुठेही धांदल-गडबड नव्हती.पुर्वनियोजित असल्यासारखं सगळ्या बारिकसारिक गोष्टी शिस्तित पार पडत होत्या.

गुरुजिंनी आमंत्रित करताच श्रीमंतीचा कार्यक्रम पार पडला.

मधल्या विश्रांतीच्या काळात सगळ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

सनई-चौघड्याचे सुर निनादले.वर-वधूच्या पोषाखात कालिंदी आणि कार्तिक अधिकच सुंदर दिसत होते.उच्चविद्याविभुषित आणि सौंदर्य याने सौंदर्याला चार तारेच जणू लगडले,असा भास होऊ लागला.

सगळ्यांना  फुलांच्या पाकळ्या अक्षद म्हणून वाटण्यात आल्या. सभागृहातले आमंत्रीतही नविन पोषाख परिधान केल्यामुळे “एकसे बढकर एक”दिसत होते.करवल्या आणि करवले बुट लपवणे आणि शोधणे या चढाओढीत दंग होते.

काही आमंत्रीत शीतपेयांचा आस्वाद घेत होते.

लहान मुले आपल्याच विश्वात रममाण होते.ज्येष्ठ ,तरुण वर्ग असे कळत-नकळत गट तयार झाले.प्रत्येकाच्या मुखी लग्न सोहळा हा एकच विषय होता.

आणि सावधान म्हणताच अंतरपाट दूर झाला.

कालिंदीला कुणीतरी वरमाला घालण्यास सुचवत होतं,तशी ती भानावर आली.

अंतरपाट धरताच भुतकाळात रमण्यामागचं कारणही तसच होतं.

कारण हा अंतरपाट “श्रीमंतीचा ताणा”आणि “गरिबीचा बाणा”ह्या धाग्यांनी गुंफला होता.कालिंदीच्या बाबांच्या उदात्त विचारसरणीमुळे श्रीमंत-गरीब ही दरी भरून निघाली होती.

सौ.माणिक शुरजोशी

नाशिक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..