अँटी बायोटिक्स हा शब्द माहीत नसलेला मनुष्य आज घडीस सापडणे अवघड आहे! 1930 साली अपघाताने लागलेल्या या शोधाने औषधोपचाराची दिशा बदलली!
मात्र जनक फ्लेमिंग, यांच्या “या अस्त्रा चा वापर जपून करा” या सांगण्याला अक्षरशा हरताळ फासत, मनुष्य आणि प्राण्यावर याचा मारा करण्यात आला! आणि आज सुपर बग्स आणि अँटिबोटिक्स रेजिस्टन्स नावाचा भस्मासुर आपल्या वर उलटू लागला आहे!
हे कसे रोखता येईल!
पेशंट म्हणून जाताना
1) योग्य डॉक्टर/प्याथि निवाडा.
2) डॉक्टर मला लवकर बरे व्हायचे आहे,स्ट्रॉंग औषधे द्या असा बाल हट्ट धरू नका.
3) शरीरातील रोग प्रतिकार शक्तीस थोडा वाव द्या.
4) डॉक्टरांनी अँटी बायोटिक्स लिहिली असतील तर त्याचा कोर्स पूर्ण करा. अर्धवट सोडलेला कोर्स आपणास ड्रग रेजिस्टन्स कडे पावला पावलाने ढकलत असतो.
बॅक्टरीया अर्थात जिवाणू अतिशय हुशार असतो,अँटी बायोटिक्स चे स्वरूप ओळखून त्याच्या कामाच्या पद्धती पाहून आपले स्वरूप बदलतो,
आणि मग पुढील दर खेपेस नवे अँटी बायोटिक या प्रमाणे तो यशाची नवी शिखरे पादाक्रांत करतो !
आताच सापडलेला एक जिवाणू इतका शक्तिशाली निघाला की त्याला सुपर बग हे नाव देण्या वाचून गत्यंतर राहिले नाही.
अजिंक्य मी! अमर्त्य मी! अशी दर्पोक्ती करत आपल्या ला ड्रग रेजिस्टन्स च्या गर्तेत ढकलत जातो!
मागील एका वर्षात 7 लाख लोक अँटी बायोटिक चा प्रभाव न चालल्याने मृत्यू मुखी पडले आणि प्रति जैविकांचा वापर असाच चालू राहिल्यास ही संख्या काही काळात एखाद्या देशाची असणार आहे हे सांगायला ज्योतिषी नको!
सर्व सामान्य माणूस याकरता काय करू शकतो
1) स्वच्छता राखणे.
2) हात धुण्याच्या सवयी लावून घेणे.
3) खाद्य पदार्थाचे स्रोत तपासून पाहणे.
फार्मासिस्ट म्हणून आपली जबाबदारी काय?
1) काउंटर ला कोणतेही अँटी बायोटिक न देणे.
2) योग्य डॉक्टर च्या प्रिस्क्री.वर च औषध विक्री करणे.
3) जुन्या चिट्ठी वर परत परतअँटी बायोटिक्स न देणे.
4) विक्रीचा पूर्ण रेकॉर्ड ठेवणे.
5) अँटी बायोटिक्स च्या सुयोग्य वापरा बाबत पेशंट चे समुपदेशन करणे!
आपल्या येणाऱ्या पिढ्या करता काही सुयोग्य कृती करावी असे वाटत असेल तर फक्त त्यांच्या करता ही औषधे वापरण्यास शिल्लक ठेवा अन्यथा या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत!
Leave a Reply