प्रत्येक व्यक्तीचे अध्यात्मिक ध्येय असते की तिने त्या चैतन्यमय ईश्वरी शक्तीचे अस्तित्त्व जाणावे, अनुभवावे. कुणाला ईश्वर भेटला वा दिसला, ह्याची खऱ्या अर्थाने विचारवंताना देखील सत्यता पटलेली नाही. परंतु अनेक प्रसंगातून मात्र त्याच्या योजनेची शक्तीची कुशलतेची जाणीव निश्चित झालेली आहे. आणि तो केवळ अनुभव जरी मिळाला तरी त्यात संपूर्ण समाधान व सार्थक असेल. ही भावना हेच ईश्वरी अनुभूतीचे दर्शन ठरविणारे असेल.
ईश्वर निराकार अस्तित्त्वामध्ये समाजाला जातो. त्याच्या सगुण अंगाच्या दर्शनापेक्षा प्राप्त होणाऱ्या चैतन्यमय अनुभवाच्या झलकेमध्येच, समाधानात डुबून जाणे त्याचे दर्शन झाल्याचा आनंद देणारे असेल. कोठे शोधावयाचे त्याला ? स्वर्गात, समुद्रात, पर्वतमय रांगात , फुलात, स्वभोवातालच्या जीव जंतू वनस्पतीमध्ये, आमच्या देहात, मनांत, कोठेही. कोठे तो नाही? ज्या दृश अदृश वस्तू वा सभोवतालच्या वातावरणात त्याची आपणाला जाणीव होते, त्या सर्वामध्ये त्या चैतन्यमय ईश्वराचे अस्तित्त्व असते. ते फक्त जाणावे लागते. अनुभवावे लागते. निराश्या तेव्हांच येते, जेव्हा त्याला दृश्य स्वरुपात कुणी बघू इच्छितो. कारण खऱ्या अर्थाने कुणीही त्याला न बघताच त्याच्या भव्य वा दिव्य शक्ती सामर्थ्यास कल्पनेच्या आधारावर रंग रूप देण्यात आलेले आहे. तसेच स्वरूप इतरांना कसे दिसणार? फक्त दिव्यत्वाचा वेगवेगळा अनुभव मात्र कुणालाही येऊ शकतो. जेव्ह्ना कित्येक प्रसंग सामान्यांना कल्पनाशक्तीच्या बाहेरचे वाटतात, विस्मयकारक असतात, मानवी विचारांच्या पलीकडले घडतात, त्याचवेळी ते निसर्गाच्या चक्रातील विशेष परंतु ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव देणारे असतात. ह्याच प्रसंगामध्ये, अनुभवामध्ये, विचारांनी एकरुप झालात, तर त्याक्षणी ईश्वराचं दर्शन झाल्याचा आनंद मिळाल्याचे समाधान मिळेल. प्रतिमेचा अट्टाहास, कल्पनेच्या स्वरूपाचे दर्शन, मात्र निराशाच पदरी पडेल.
ईश्वर म्हणजे काय कोण कसा, ह्या प्रश्नाचे उत्तर आज पर्यंत तरी अगदी निशित स्वरुपात वा एकमुखाने मिळालेले नाही.आपल्या द्रीष्टीक्षेपात ज्या ज्या आकारामय गोष्टी दिसतात, त्याचे आम्ही नामकरण करीत गेलो. हे सारे एकमेकाच्या संवादासाठी. तो पर्वत, तो समुद्र, ती नदी, ते जंगल, धबधबा, हवा, पाऊस, वादळ, ढग, झाडे, हिमाछादीत पठारे, सूर्य चंद्र अग्नी वारा, इत्यादी. अनेक अनेक आकारमय गोष्टी आपल्या द्र्ष्टीपटात येत जातात.
त्याला सामुहिक वा वैयक्तिक आम्ही संबोधित आलेलो आहोत. सर्व वस्तू आम्हाला समजल्या. त्याचे नाव ऐकताच प्रत्येक वस्तू आमच्या नजरे समोर येते. हा समजण्याचा परिणाम होय. परंतु हे वरवरचे ज्ञान आहे. झाड म्हणजे काय, नदी म्हणजे काय, पर्वत म्हणजे काय, समुद्र म्हणजे काय? ह्या अनेक गोष्टी बद्दल आम्ही अज्ञानातच असतो. त्यांना समजतो जाणतो त्याची बाराकाईने
विश्लेषणात्मक माहिती मिळते. येथ पर्यंतच आमच्या मर्यादा पडतात. हे सारे विज्ञान आहे. आम्ही त्या विज्ञानातच आनंद घेतो. समाधान मानतो. परंतु हा आनंद अज्ञानाच्या रूपाने जणू पडदाच असल्याप्रमाणे आहे. वस्तू जाणणे आणि ती वस्तू अनुभवाने ह्या संकल्पनेत खूप फरक आहे. सुंदर गुलाबाचे फुल बघताना, उंचावरून पडणाऱ्या धबधब्याकडे बघताना, पौर्णिमेच्या शीतल चन्द्राकडे बघताना, कोकिळेची मधुर तान ऐकताना, इंद्रधानुशाचे रंग बघताना, मोराचा पिसारा फुललेला असताना नाच बघताना, एक नाही अनेक अश्या गोष्टी बघताना ऐकताना प्रत्येकजण नुसता आनंदात डुबून जात नसतो, तर तो काही क्षण स्वता:ला विसरून जातो. हीच त्याची ध्यानधारणा होय. आणि जे अशा नैसर्गिक वातावरणाशी एकरुप होतात, तोच त्याचा ईश्वरी अनुभव होय. समोर पसरलेल्या अथांग आणि अगणित वस्तूमध्ये अगदी अनुरेणुमध्ये तो ईश्वर पसरलेला आहे. त्याला अनुभवण्यासाठी दिव्यद्र्ष्टीची गरज आहे म्हणतात, हे सत्य आहे. आमच्या द्रिष्टीला वस्तू दिसते, ती त्या वस्तूची जाण. त्यालाच जेंव्हा दिव्यद्रीष्टी अनुभवते तोच ईश्वर नव्हे काय? . म्हणूनच त्याचे स्वरूप निराकार आहे.
अपल्या द्रीष्टीक्षेपात, जाणीवेत ज्या ज्या वस्तू येतात ते सारे त्याचेच अंग असते. थेट तुम्ही मी आणि सारा सभोवताल. हे विश्व अनंत अथांग आणि सर्वत्र. हेच तर परमेश्वराचे स्वरूप आहे. आम्ही सदैव जे आमच्या आत बाहेर बघत असतो तोच तर ईश्वर. त्याचे ऋषीमुनींनी वर्णन केले आहे ” सत चित आनंद “ याचा साधा अर्थ जेंव्हा चित्त अर्थात मन सत्यमय होते आनंदमय होते, त्याच क्षणी प्रत्येकास त्या ईश्वराच अनुभव आलेला असतो.
असे आनंदाचे क्षण आम्हास क्वचित प्राप्त होतात. जेंव्हा आमचा बघण्याचा विचाराचा स्वभावाचा दोष असतो, आमचे राग लोभ मोह अहंकार इत्यादी आम्हास त्या आनंदा पासून सतत वनछीत करतात. प्रसन्न वा शांत मनच सभोवतालच्या परिस्थितीतून ईश्वरी आनंदाचा अनुभव मिळवू शकते. ईश्वरी अनुभवाचा उद्देश वा साध्य ह्या फक्त परमानंदातच असतो. आणि तो प्रसंगानुसार प्रत्येकाला मिळत असतो. ईश्वरी सानिध्याच्या कल्पना जेंव्हा ” सगुणरूप अपेक्षेमध्ये दर्शन” अथवा इच्छित मनोकामना पूर्तीत असते, तेंव्हाच आपण निराशेच्या वातावरणामध्ये जातो. संसारिक सुख दुःखाची निर्मितीच मुळी वासनेच्या पायावर आधारलेली असते. देहाच्या कार्यात वासना ( desire ) हीचा सतत सहभाग असतो. माझ्यात सभोवताली द्र्ष्टीक्षेपात अगदी जवळ असलेल्या त्या परमेश्वराला मी माझ्या अज्ञानामुळे जाणत नसतो. कल्पनेच्या राज्यातून त्याची जवळीक साधतो. त्याला सगुण रुपात बघू इच्छितो.
जे वाचलेले ऐकलेले पौराणिक कथामध्ये ज्याची वर्णने समजली त्या देहमय रूपाचे आम्ही दर्शन घेऊ इच्छितो. पण हे केव्हांच घडणारे नसेल. तुमची इच्छा भावना ही केवळ अंधश्रधा ठरेल. कुणाला काही साध्य होणे हे कदाचित प्रासंगिक म्हणून क्वचित असेल ही. तो परमात्मा म्हणजे एक विशाल प्रचंड असा निसर्ग आहे. त्याच्याच आखून दिलेल्या निअमानुसर सर्व चालत असते. विशेष कृपा वा चमत्कार यांना येथे जागा नसते. श्रीमदभग्वतगीतेच्या महान शिकवणीनुसार हे संपूर्ण विश्व ज्यात सूर्य चंद्र प्रथ्वी तारे तुम्ही आम्ही सारे सारे एकाच असून एकाचेच हे अनेक भाग असलेले आम्हास भासते.
हेच अद्वैत तत्वज्ञान आहे. ( Divine presence is monism ) अथवा knowledge of Unity . प्रत्येक पदार्थ दोन गुणांनी संपन्न असतो. एक दिसतो, भासतो, समजला जातो, हा गुणधर्म. दुसरा त्या पदार्थामध्ये शक्ती रूपाने ( उर्ज्या ) सर्वत्र पसरलेला असतो. दोन्हीही गुणधर्म एकरुप होऊनच त्या पदार्थाचे खरे अस्तित्व झालेले असते. ह्यालाच ” शिव आणि शक्ती “ स्वरूप म्हणतात. पदार्थ ( Materialistic ) म्हणून आपल्या ज्ञानद्रीयाला समजते. त्याचा रंग रूप आकार इत्यादी परिमाणाने त्या समजतात. प्रत्येक पदार्थाला जसे स्थूल आकारमान असते, त्याच प्रमाणे तो पदार्थ अनेक वा अगणित सूक्ष्म घटकापासून बनलेला असतो. आजच्या घडीला विज्ञान शास्त्राला त्या सूक्ष्म घटकाची माहिती मिळाली त्यानुसार त्याला अणू ( ATOM ) संबोधले गेले. ह्या “अणूच्या ” अंतरंगात अनिमध्ये प्रचंड शक्तीची साठवणूक असते. आपणास ती सूक्ष्म अवस्तेत भासत असली तरी तिच्या प्रचान्दातेचे, भावातेचे, परिमाण करणे केवळ शक्य होणार नाही. आणि अनिमाधली सर्व उर्जा शक्ती ही त्या संपूर्ण पाधार्थामाधालीसतात कार्यरत परन्तुअवक्त शाकी समजली जाते. सजीव असो वा निर्जीव असो तो पदार्थ ( materialistic ) आणि त्याची शक्ती ( Energy ) ह्याच दोन अंगानी विश्वात विखुरलेल्या आहेत. अद्वैत तत्वज्ञानामध्ये ह्यालाच परमेश्वर समजले गेले आहे. सभोवतालच्या दृश्य वस्तू संग्रहातून आणि माझ्यातून त्याचे जसे ज्ञान होते, तसेच त्याला एकरुप होऊन अनुभवाने ( Awareness of that consciasness ) अथवा ( तो experience of that Divine Suprime ) ह्यालाच परमेश्वराचे दर्शन झाले असे म्हणता येईल.
(चुकाबद्दल क्षमा असावी. )
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply