अनुकरण करणे हा स्वभाव
काय मग म्हणू मी त्याला हो…।।धृ।।
स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी
निर्णय शक्ती असते मनीं
दुजाचे जीवन यश बघूनी,
अनुकरण त्याचे करता हो….१,
अनुकरण करणे हाच स्वभाव,
काय मग म्हणू मी त्याला हो …
त्याची स्थिती वेगळी होती
म्हणून यश पडले हातीं
वातावरण निराळे असती
तुम्हास सारे हे कळते हो…..२,
अनुकरण करणे हाच स्वभाव,
काय मग म्हणू मी त्याला हो …
यशस्वी ठरला कुणी एक
जेव्हां केले प्रयत्न अनेक
विसरू नका नशीब ठीक
जे यशांत सहभागी होते हो….३,
अनुकरण करणे हाच स्वभाव,
काय मग म्हणू मी त्याला हो…
सोडून द्या अनुकरण ते
निर्णय घ्या जे बुद्धी सांगते
तुमचा आत्मा प्रभू असूनी
त्याजवरती विश्वास करा हो…..४
अनुकरण करणे हाच स्वभाव,
काय मग म्हणू मी त्याला हो …
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply