अनुप्रास अलंकार
चारोळी
(१)
गाता गीत गाऊनी
गायकाघरी गायकी
गाजती गीतमैफीली
गान कोकीळ गात की
(२)
चमच्याने चिवडा चाखा
चाखतांना चापून चारा
चिवड्यातल्या चारदाण्यासह
चावून चावाच चुपचाप सारा
(३)
गंध गुलमोहराचा
गंधाळला गारवारा
गोकर्ण गेला गगनासी
गुरवाघरी गेला गावसारा
(४)
हलवाई हलवती हलवा
हल्दीरामचीच हवा
हिरवीबर्फी हिरवापिस्ता
हिरव्यातील हिरवा
(५)
नव्याची नवलाई
नवरीच्या नथनीची
नाकात नसतांना
नकोशीच नाचक्की
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply