पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येती,
सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असती…१,
ह्या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,
अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही….२,
हेच तत्त्व त्या प्रभूचे, तीन गुणांनी बनला,
उत्पत्ती लय स्थीती, यांनी सर्वत्र व्यापला…३,
ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे
अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे…४,
याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,
अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply