सारखा संघर्ष करत करत,
अंतर्मन तुटून जाई,
सुखाचे भरभरून समुद्र
मग भले मिळोत कितीही,—
किती त्याला अर्थ नाही,–?
अशा जीवनात अर्थच नाही,–?
पाण्यावाचून कोरडे, पडत,
पीक सारखे गळत राही,
मग पडत राहिला पाऊस,
किती त्याला अर्थ नाही,–?
अशा जगण्याला अर्थ नाही,–?
किती मोठा असे परिवार,
करत असेल जर दुःखी,
हे असले कसले संबंध,–?
करती मने दूषित वारंवार ,–
त्यांच्यात काही अर्थच नाही,
अशा जीवना, अर्थ नाही,-!!!
रोज छोटे-छोटे आनंदक्षण,
हातून निसटून जाती ,—
त्यांच्यासाठी तरसत तरसत,
मग प्रतीक्षा सुखाची नित्य,—
करत बसण्यात अर्थ नाही,
अशा जगण्यालाच अर्थ नाही,–!!!
कोणी कडू बोलून बोलून,
मन पुरते घायाळ होई,
मग नंतर गोड बोलून ,
आहे का उपयोग काही,–?
कोणता अर्थ त्यात राही,-?
खरंच त्यात अर्थ नाही,–!!!
सुखसाधने असून खूप,
नेमके सतरा रोग शरीरी,
मग त्या सुविधा अगणित,
किंमत ना त्यांना काही,
असूनही काही उपयोग नाही,
अशा जगण्याला अर्थ नाही,
अशा जगण्याला अर्थच नाही,–!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply