आमच्या नितीन नांदगावकर साहेबांवर केलेली एक कविता. ती वाचून विषयाचा संदर्भ आपणास लागेलच. धन्यवाद.
अन्यायाचा अंधक्कार माजतां,
एक हात पुढे येतो,–
जुलुमांच्या बुजबुजाटां,
तो इतिश्री देतो,–!!!
कुणी रडे, कुणी कळवळे,
कुणी आपल्या जिवाला खाई, अत्याचारांचे रान माजता,
कुणी एकदम हाय खाई,–!!!
असा हा:हा:कार होता,
मदतीस येईना कोणी,
वाली कोण आपुला आता,
जनता दहशत घेई,–?
जिकडेतिकडे सामान्य जनता,
धूर्त वेठीस धरती,–
लुबाडून लाखो रुपयां,
स्वप्न धुळीस मिळवती,–!!!
कुणी फसवे, कुणी लुटे,
गोड किती बोलती,
जरा कुठे संधी मिळतां,
हात मारुन पळती,–!!!
अशावेळी कोण त्राता,
जनता न्यायाला तरसे,
शिंगरे हेलपाट्याने मरती,
धावती घोडे घालून डाकां,–!!!
न्यायाला टांगून ठेवती,
पण तो आहे मर्द खरा,
हतबलता जाणून घेई,
कृतीने दाखवी सक्रियता, –!!!
रंजले गांजले दुवा देती,
आशीर्वाद हे मिळती त्याला
दुर्जना साऱ्या, शिक्षा मिळती न्यायही बघा मिळे सर्वां,–!!!
वाममार्ग ज्याने पत्करला,
त्याला तर ठोकूनच काढी,
अपार प्रेम करी जनता,
आपला आधारच मानी,–!!!
देव दिनाघरी धावला
तसाच तूही बघ धावशी,
इतरांचे ठाऊक नाही,
मज देवदूतच भासशी,–!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply