अपेक्षांचा डोंगर वाढतच जातो
त्या मागे माणूस धावतच राहतो
अपेक्षांचा ओघ वाहवत असतो
कुठेतरी विश्राम द्यायचा असतो
आणि ………..
इथच चुकतं,नव्वद टक्के मार्कस् मिळाले
आई म्हणे बाळा
थोडा अभ्यास केला असतास तर……
तर नक्कीच वाढले असते टक्के
पाच लाखाचं पॅकेज
अमुक कंपनी जास्त देईल पॅकेज
तृप्ती नाहीच……..
अपेक्षांचा नाही…..
तृप्तीचा डोंगर वाढू दे
प्रयत्न सोडू नको रे,
अपेक्षा ठेव रे,
पण मिळालेल्या यशास
तुच्छ लेखू नको रे
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply