सर्वसाधारणपणे अपेक्षांच्या भोवतीच जीवन फिरत असते. बहुतेंक अपयश वा समस्या या अपेक्षांचा ताळमेळ नीट न जुळल्यामुळे निर्माण होतात. बऱ्याच अपेक्षा या स्वयंपुर्ण राहिल्यास आटोक्यात राखता येतात. दुसऱ्या संबंधीत असलेल्या अपेक्षांची टक्केवारी तर अगदी नगण्य आहें. यात आई, वडील, नवरा, बायको, मुलेे, इतर नातेवाईक, मित्र, सामाजिक इत्यादींशी संबंध येतो.
यांना आपण अपेक्षांच्या चौकटीत कसें बसवतो यावर मिळणारे सुख आनंद देईल ? का ? दुःख देईल ? हें ठरते.
साधच उदाहरण सहलीचे देता येईल. तेंव्हा आपली निवाऱ्याची सोय होणे महत्वाचे असते. मी जेंव्हा सहलीस जातो. तेंव्हा मुलभुत सोयी आहेत ना ? एवढेच बघतो. बाकी कोणत्याही इतर दिखाऊ सोयींची अपेक्षा करत नाहीं. लॉजच्या कर्मचाऱ्यांशी नीट बोलतो.यामुळे अपेक्षे बाहेर चांगली सेवा वागणुक मिळतें. म्हणुनच एकदा अपेक्षा करणे सोडले किं सुख आपोआपच आपल्या मागे धावत येतें.
इति लेखन सीमा,
अनिल भट
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक अनिल भट ह्यांनी लिहिलेला हा लेख
Leave a Reply