‘माझं’ किंवा ‘आमचं’ मुल ही घटना सत्य असली तरी मला ही कल्पनाच मान्य नाही. त्या जीवाचा जन्म आपल्यामुळे झालेला असला किंवा त्या जीवाला जगात आणण्याच्या निसर्गाच्या करामतीनुसार आपण केवळ निमित्तमात्र ठरलेलो असतो आणि म्हणून त्याला आपण ‘आपलं’ म्हणत असतो. बायोलाॅजिकल दृष्टीने ते मुल आपलं असतही. पण ते तेवढंच..!
आपल्या पोटी रूजून आलेलं ते रोपटं नक्की कुठल्या ‘जाती’चं आहे हे भल्या भल्याना ओळखता येत नाही. मात्र आपल्या निसर्ग उर्मीनुसार त्याला आपल्या मतानेच पाणी, खत घातलं जातं. हे सर्वचजण करतात. पुढे काही वर्षांनी ते रोपटं झाड बनू लागतं, तेंव्हा त्याची जात’ कुठली असावी याचा अंदाज, फक्त अंदाजच, येऊ लागतो व तेंव्हा कळतं की त्याच्या सुरूवातीपणापासूनचं पाणी-खताचं प्रमाण चुकलेलं, योग्य किंवा बरोबर आहे. इथे ‘जात’ याचा अर्थ ‘पाहिजे जातीचे’ मधला घ्यावी, समाजातील जातीववस्थेचा याच्याशी काही संबंध नाही.
आपल्या पोटी नैसर्गीकपणे आलेला तो जीव आपण भले ‘आपला’ म्हणत असू तरी तो तसा नसतो हे माझं मत आहे. आपण फक्त निनित्तमात्र. तो जीव ‘स्वतंत्र’ असून तो पुढे त्याच्या निसर्गदत्त प्रोग्रामनुसारच वागणार असतो. आपण सर्वच तो जीव एक ‘स्वतंत्र’ व्यक्ती आहे हेच विसरतो व आपल्याला जे योग्य-अयोग्य वाटते ते त्याच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो. याला संस्कार असंही म्हणतात. या संस्काराच्चा खत-पाण्यानुळे थोडासा फरक पडतो, नाही असं नाही, परंतू त्या झाडाला फाळं-फुल मात्र त्याच्या नैसर्गिक प्रोग्रामनुसारच प्येतात. आई-वडीलांची जबाबदारी रोपट्याला त्याच्या सुरूवातीच्या काळात त्या रोपट्यावा संरक्षण मिळावं म्हणून घातलेल्या कंपाऊंडप्रणाणेच असावी, रोपट्याला त्याच्या उर्मीनुसारच झाड बनू द्यावं हेच अनेकजण (सर्वच नाही) विसरतात..!!
अगदी संस्कारक्षम घरात जन्मला-वाढलेला जीव पुढे समाजाच्या दृष्टीने वाया गेलेला आढळतो तर रस्त्यावर किंवा झोपडपट्टीत जन्मलेला जीव पुढील आयुष्यात मोठा झालेलाही आढळतो. अशी दोन्ही उदाहरणं जगात भरपूर सापडतात. तसंच डाॅक्टर झालेलं मुल आयुष्यात कधीही डाॅक्टरकी न करता ‘स्टेज’ची क्षितिजं धुंढाळताना दिसतो तर इंजिनिअर झालेला गायकीच्या क्षेत्रात मोठा झालेला आढळतो. कोणाला लेखक-कवी व्हावसं वाटत असतं पण लहानपणापासून योग्य वातावरण व संधी न मिळाल्याने तो लेखणीशी संबंधीतच परंतू खर्डेघाशी करत बसलेला आढळतो. अशीही उदाहरणं बक्कळ दिसतात. या सर्वाचाच संबंधं संल्काराच्या खत-पाण्याशी असतोच असंही नाही. तो जीव त्याच्या आपण मात्र उगाच ‘मी’ किंवा ‘आम्ही’ त्किंवा ‘अमक्या-तमक्या’ने याला घडवलं वा बिघडवलं असं म्हणतो.
याचा अर्थ असा नाही की त्या मुलावर संस्कार करण्याचा वा त्याला घडवण्याचा प्रयत्नच करू नये. तो तर करावाच, प्रत्येकजणच आपापल्या कल्पनेप्रमाणे व आपा-आपल्या पूर्वसंस्कारानुसार तसं करतच असतो, पण तसं करताना ते मुल एक स्वतंत्र विचारांची व स्वतंत्र बुद्धीची व्यक्ती आहे हे विसरता कामा नये. ते झाड त्याच्या नैसर्गिक उर्मीप्रमाणंच फुलणार-फळणार हे न विसरता, त्या मुलाचा नैसर्गिक कल लक्षात घेऊन त्याला आवश्यक ते खत-पणी-नत्र दिलं पाहीजे हेच नेमकं भावनेच्या वा वात्सल्याच्या वा त्या मुलातील ओव्हर इन्वहाॅल्वहमेंटमुळे विसरलं जातं. आताच्या काळात एक अथवा दोनच मुलं असल्यामुळे पूर्वीपेक्षा आता मुलांमधे आई-वडीलांची भावनिक गुंतवणूक जास्त असते आणि चिक इथंच होते.. असं होता कामा नये हे अपेक्षित असलं तरी तसं होताना दिसते. मुलाची स्वतंत्र बुद्धी ओळखायला बरेचजण हमखास चुकतात आणि मग त्या मुलाचे गाडी त्यांनी ठरवलेल्या मार्गावरून न धावता दुसरीकडेच किंवा यार्डात सायडींगला पडलेली पाहून स्वत:चं कुठेतरी कमी पडलो असं म्हणत कुढत वा त्या पोराला दोष देत बसतात..!
आता नशीब मानणाऱ्यांसाठी (मी नशीब मानतो.).! आपल्या पोटी जन्माला आलेला तो जीव जीवशास्त्रदृष्ट्या आपला असला तरी त्याचं स्वत:चं नशीब सोबत घेऊन आलेला असतो. नशीब मानायचं ठरवलं तर, या जगात येणारी प्रत्येक व्यक्ती स्वत:चं नशीब सोबत घेऊन आलेली असते. त्याच्या नशिबात जे लिहीलेलं असेल, त्या प्रमाणेच घडणारच असतं. त्यात कोणीही कसलाही बदल करू शकत नाही. अनेकजण याच्यामुळे असं घडलं किंवा त्याच्यामुळे तसं घडलं असा विचार करताना दिसतात. असा विचार तरणंच चुक आहे. प्रत्येकाचं आयुष्य घडणं वा बिघडणं संपूर्णपणे त्याच्या नशिबावर आवलंबून असते. कोणामुळे वा कोणी आयुष्यात येण्याने वा जाण्याने कोणाचं काहीच बरं-वाईट हेोत नसते.
म्हणून आपल्या पोटी जन्माला आलेलं मुलं जरी ‘आपलं मुल’ म्हणून जन्माला आलेलं असलं तरी तेखरच ‘आपलं’ असतं का हा प्रश्न मला नेहेमी पडतो..!!
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply