नवीन लेखन...

अपोलो हॉस्पिटल्स

समर्थ रामदासांनी त्यांच्या एका समासात दासबोध ग्रंथात म्हटलेलं आहे की, पतीला पत्नी आणि पत्नीला पती उत्तम गुणाचे मिळणं ही पूर्वजन्म पुण्याईच असते.’ अगदी त्याच भावनेतून आजच्या प्रत्येक व्यक्तीला निःस्पृह, निःस्वार्थी वगैरे शब्द सोडा, परंतु वाजवी दरात औषधोपचार करणारा डॉक्टर मिळणं हीदेखील पूर्वजन्माची पुण्याईच म्हणावी लागते. असा डॉक्टर अनुभवायला मिळाला तर खरंच त्याला कलियुगातील ईश्वरच म्हणावेसे वाटते. असाच एक डॉक्टर… डॉ. प्रताप सी. रेड्डी. मूळ चेन्नई येथील. मात्र युनायटेड स्टेटसमध्ये वैद्यकीय व्यवसायात व्यग्र. एकदा एका रुग्णाला जवळच्या शहरात टेक्सास येथ नेण्यासाठी म्हणजे ‘ओपन हार्ट सर्जरी’ करावी लागणार होती म्हणून तातडीने हलवावे लागले होते, परंतु प्रवासात पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे तो रुग्ण दगावला. या घटनेचा डॉ. प्रताप रेड्डी यांच्या मोठा परिणाम झाला. मनावर डॉक्टरदेखील संवेदनाक्षम असू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. रेड्डी.

ते मायदेशी परतले. युनायटेड स्टेटसमध्ये जर ही स्थिती असेल तर आपल्या मायदेशात काय होत असेल या भावनेतून त्यांनी चेन्नईमध्ये १९८३ साली सहकारी तत्त्वावर आधारित 20 संपूर्ण हिंदुस्थानातील पहिले ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर’ सुरू केले. आशिया खंडातील सर्वात मोठे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे डॉ. रेड्डींनी सुरू केलेले ‘हेल्थ इज वेल्थ’चं महत्त्व जपणारे ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर’ म्हणजे ‘आधुनिक  उपग्रहा’ इतकेच महत्त्वाचे म्हणून त्या काळात गाजलेल्या ‘अपोलो’ उपग्रहाचे नाव त्यांच्या ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर’ला ‘अपोलो हॉस्पिटल’ या नावाने निश्चित केले असावे.

या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या ‘अपोलो हॉस्पिटल्स’द्वारे जागतिक दर्जाच्या हॉस्पिटल सुविधा ‘स्पेक्ट्रा क्लिनिकल रिसर्च सेंटर्स’ नावाने सुरू आहेत. अत्याधुनिक तांत्रिक विज्ञान कौशल्यांसह अपोलो हॉस्पिटल्समध्ये १४ भागीदार (मालक) आणि १४ हॉस्पिटल्स यांच्या सहकारातून १९८३ च्या दरम्यान ६२८० कॉटची `रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली. डॉ. रेड्डी यांनी साऱ्या जगाला दाखवून दिले की, वैद्यकीय संशोधन आणि सुविधांमध्ये हिंदुस्थानी कौशल्ये ही जगात कुणापेक्षाही कमी नाहीत. गेल्या २० वर्षांत अपोलो हॉस्पिटल समूहाने दहा लाखांहून अधिक रुग्णांना मायेचा स्पर्श करून २२ केंद्रांद्वारे व्याधीमुक्त केले आहे.

जागतिक दर्जाचे अत्याधुनिकन नियोजन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुविधा, दर्जेदार काळजी घेण्याची पद्धती, नावीन्यपूर्ण संशोधित उपचारपद्धती उदा. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप, लिमेडिसीन, हेलीओज – री हॅबिलिटेशन प्रोग्राम इ. उपचारात्मक उपक्रम जगभर आणि सर्वप्रथम त्यांनी सुरू केले. त्यांच्या या सेवेमुळे हिंदुस्थानींसह मध्य-पूर्वेकडील देश, यू. एस., यू. के., आफ्रो-एशियन देश अशा देशांमधील रुग्णही व्याधीमुक्त होऊन प्रभावित झालेले आहेत.

अत्यंत प्रशिक्षित नर्सेस-पॅरामेडिकल आणि प्रशासकीय स्टाफ सुमारे १६ हजारांहून अधिक असून विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा या समूहाचा पारिवारिक सदस्य आहे.

हिंदुस्थान सरकारने त्यांच्या या परिश्रमाची दखल घेतली आणि कंपन्यांना जसे फंडस् खुले केले जातात तसे ‘अपोलो’लाही इंडस्ट्रीप्रमाणे सुविधा दिल्या, आज सुमारे ९०,००० संस्थांद्वारे हिंदुस्थानात प्रमुख आणि मैलाच्या दगडाप्रमाणे परवडणारी ‘वैद्यकीय सेवा ‘मिशन’ अपोलो हेल्थ केअर सर्व्हिसेसद्वारे सुरू आहे.

-प्रा. गजानन शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 30 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

1 Comment on अपोलो हॉस्पिटल्स

  1. SERVICES AND MEDICATION IN APOLLO HOSPITALS ARE WORLD CLASS BUT NOT AFFORDABLE TO 95 PERCENT OF PATIENTS.
    THANK U

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..