नवीन लेखन...

सफरचंद

हिमालयाच्या पायथ्याशी ते अगदी थेट काश्मीरपर्यंत सफरचंदाची झाडे सापडतात. कोकणात जसे आवळ्याची झाडे प्रत्येक ठिकाणी सापडतात. अगदी त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत गाजर हे गरीबाचे पूरक अन्न अगदी त्याचप्रमाणे काश्मीर ते हिमाचल प्रदेशापर्यंत सफरचंदाची झाडे पसरलेली असतात. असेच अमेरिकेत लोक आदिवासी जमाती राहात असत अगदी त्याचप्रमाणे भारतीय गरीब लोक सफरचंद खात असत. मात्र अगदी त्याचप्रमाणे सफरचंद अगदी दक्षिणकडे आशिया खंडातही मिळते व ते युरोपातही आले. आज जवळजवळ अनेक सफरचंदाच्या जाती लावल्या जात असतात व त्याची चव तसेच गुणधर्म याची वेगवेगळे असतात. आज ५५ मिलीयन टन एवढे सफरचंदाचे उत्पन्न होते. सफरचंदही नेहमी बियापासून अथवा कलम केल्यापासून तयार होते. जगातील सफरचंदाचे सर्वात जास्त उत्पन्न चीनमध्ये तयार होते व अमेरिकेचा नंबर दुसरा लागतो तर इराक तिसरा व भारतामध्ये चौथा वगैरे असतो. तसेच टर्की, रशिया येथेही सफरचंदाचे खूप उत्पादन मिळते.

भारतातही आज सफरचंद बऱ्यापैकी मिळते. काही काही इतके स्वस्त असतात की, काही लोक सफरचंदाची भाजीही तयार करतात. सफरचंदाचे अनेक प्रकार तयार करतात. जसे अमेरिकेत सलाड बनविण्याकरिता अथवा जेवणापूर्वी सफरचंद खाण्याची प्रथाही असतेच. सफरचंदात बरेच चांगले गुणधर्म आहेत ते म्हणजे, ज्याला अन्न पचत नाही. अन्न खाल्यावर घशाशी येते, आंबट उलटी होते अशा अपचन अथवा पित्त झाल्याने सफरचंदास निश्चित फायदा होतो. रोग्याला जर भूक लागत नसेल तर सफरचंद उकडून त्याचा रस काढून देतात. याने रोग्याला चांगली भूक लागते. अंगावरील फोड, अंगाची आग अथवा खाज वगैरे सर्व रोग बरे होतात.

दारू पिण्याची सवय जर सोडावयाची असेल तर अशा व्यक्तीने सफरचंद खावे. डोकेदुखी झालेल्या माणसाने सफरचंद खावे. डोकेदुखी थांबते. सफरचंदाने थंडी कमी होते.

आपल्याकडे आता सर्वच फळांचे रस बाजारात मिळतात. पण असे रस घेतल्यास बरेच तोटे होतात. रसाऐवजी नुसते सफरचंद अथवा इतर कोणतेही रस खाल्यास आपल्याकडे चोथा उरतो त्याला फायबर म्हणतात. या फायबरमुळे पोट साफ होऊन जाते. अशा प्रकारचा रस फळे सोडून सर्व चोथ्यामुळे खूपच फायदे होतात.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..