साहित्य : २ मोठी सफरचंदे, २० मारी बिस्कीटे, दीड कप साईसकट दूध, १ चमचा व्हॅनिला इसेन्स अर्धा कप साखर.
कृती : प्रथम सफरचंदाची साले काढून बारीक चिरावी, त्यात थोडे पाणी घालून शिजवावे, थोड्या वेळाने त्यात साखर घालावी, जरा शिजवावे व उतरावे. नंतर त्यात इसेन्स घालावा काचेच्या बाऊल मध्ये ८/१० बिस्कीटांचा चुरा करुन घालावा त्यावर सफरचंदाचे अर्धे मिश्रण घालावे त्यावर थोडे साखर घातलेले दूध घालावे, नंतर त्यावर परत बिस्कीटाचा चुरा व सफरचंदाचे मित्रण घालावे. उरलेले दूध बाजूने घालावे व डेकोरेट करुन फ्रीजर मध्ये ठेवून थंडगार करावे चार तासाने बाहेर काढून खाण्यासाठी सर्व्ह करावे.
— सौ. निलिमा प्रधान
Leave a Reply