युनेस्कोतर्फे दरवर्षी २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस साजरा केला जातो. युनेस्कोने पहिल्यांदा १९९५ मध्ये या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी, म्हणून या दिवसाचे आयोजन केले जाते. तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा प्रसार व्हावा म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे.
पु.ल. देशपांडे, अरुण साधू, जयवंत दळवी, शं.ना. नवरे, व.पु. काळे यांचे लेखन आपल्याला आवडते, कारण ते आपल्याला सहज समजते. पण त्याचबरोबर इतर लेखकांचे लेखन समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा वाचनाने आपलीच साहित्याची आणि त्याचबरोबर जीवनाची जाण वाढत असते. आपणच हळू हळू ठरावीक पायऱ्यांनी अशा वरवर अवघड, पण श्रेष्ठ पुस्तकांकडे जायला हवे. वाचण्याची इच्छा असणाऱ्यांचा अनेकदा पहिला प्रश्न असतो- ‘कोणती पुस्तके वाचायलाच हवी?’ मराठीत प्रसिद्ध झालेल्या हजारो पुस्तकांतून अशी एक यादी तयार करणे अर्थातच अतिशय अवघड आहे. त्यांचाही आस्वाद घ्यावा अशी अपेक्षा आहे.
वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो. अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. मात्र आजच्या दिनाच्या औचित्याने आडातले पोहणाऱ्यांना नक्कीच आणता येईल.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply