आरशात चेहरा बघतां,
किती असेच चेहरे दिसती, मुखवट्यांचे जग हे,
अवतीभोवती कसे नाचती,–!!!
लागत नाही मुळीच पत्ता,
अशावेळी विलक्षण फसगत,
होत जाते,केवळ फरपट,
तडफड होते मैत्री करतां,,-!!!
कोण कुठला आहे तो,
पक्के ठाऊकही नसते,
तरी नवांगताची पण ओढ,
अनावर की असते,–!!!
त्याच मोहाच्या क्षणी,
घ्यावे आपण आवरते,
करती खूप साखरपेरणी,
गोड गोड बोलती मुखवटे–!!!
अनुभव कडू-गोड देतो,
वर जिवाची होते लागणी,
असा भोवरा तो बघा,
माणूस खोल खोल जातो,–!!!
मैत्रीच्या गुंत्यांमध्ये,
गटांगळ्या खात राहतो,–!!!
वर हात देण्या न कुणी,
होते दारुण अवस्था,
कशी जिवाची होते तगमग,
कुठे जाऊ, काय करू आता,–!!!
सगळ्यात असून कशातच नसणे,
— हे तत्त्व फक्त ठेवावे,
गोड बोलण्यावर फक्त,
उदासीन की राहावे,–!!!
वागणे” तटस्थ म्हणुनी,
अशावेळी, कामी येते,
प्रतिक्रियाच कुठली नसता,
क्रिया अर्थहीन ठरते,–;;!
मुखवटे पांघरूनी जगात,
असे कितीक भेटती,
दुर्दैवाने कधीकधी ,
जवळचेही यात मोडती,–;;!
नाते असूनही ते नसणे,
ताप देते किती जिवा,
नात्यांचा अर्थ कधी,
लागतो केवळ दुरावा,–!!!
असे अंतर सांभाळणे,
मुखवटाच तो पांघरुनी,
जीव लावावयाचाच नाही,
ठरवावे ठाम ठरवावे मनी,–!!!
कसा लागावयाचा निभाव, आपल्या प्रांजळ जिवाचा, बुडत्याचा पाय खोल,
आणखी खोलच जायचा,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply