एक अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून साहित्याच्या प्रांतातली प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर तथा आरती प्रभू. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई या गावी झाला.आपल्या बहारदार शब्दसंवेदनेतून मराठी मनाला भुरळ घालणार्याल मा.आरती प्रभूंच्या यांच्या वडिलांना अर्थार्जनासाठी कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी स्थलांतर करावं लागलं. सावंतवाडीत प्लेगच्या साथीमुळे त्यांना ताबडतोब तेथून ही स्थलांतर करावं लागलं, आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले, पण त्यांच्या शिक्षणात सतत काहीना काही कारणांनी खंड पडत राहिला, पण १९६० मध्ये ते एस.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण त्याआधीच खानोलकरांनी लेखनाला सुरुवात केली होती. “ब्लार्क” मध्ये त्यांची कथा व कविता प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर सत्यकथेच्या अंकात जाणीव ही कथा प्रसिद्ध झाली; पण सत्यकथांमध्ये “शुन्य श्रुंगारते” या कवितेला प्रसिद्धी मिळाली आणि पुढे तर त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय झाल्या. या सर्व कविता खानोलकरांनी “आरती प्रभू” या टोपण नावाने लिहिल्या. १९५८ सालच्या मराठी साहित्य संमेलनात, त्यांना कविता वाचनाची संधी मिळाली. उदरनिर्वाहासाठी खानोलकरांनी पुन्हा मुंबई गाठली; तिथे आकाशवाणी केंद्रात स्टाफ आर्टिस्ट म्हणून रुजू झाले. त्याच काळात “जागोवा” हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यांची “पाठमोरी” ही कथा सत्यकथेत तर “झाडे नग्न झाली” ही त्यांची कादंबरी रहस्यरंजनच्या दिवाळी अंकात छापून आली. त्यामुळे खानोलकरांच्या लेखनाला अधिक गती मिळाली. खानोलकरांनी सर्व प्रकारच्या वाड्मयात मुशाफीरी केली यामध्ये अनुवाद, स्फुटलेखन, बालवाड्मय, एकांकिकांचा समावेश होतो. “एक शुन्य बाजीराव”, “सगेसोयरे”, “अवध्य”, “अजब न्याय वर्तुळाचा”, “कालाय तस्मै नम:” सारख्या दर्जेदार, रहस्यमय नाटकांनी रंगभूमी तर गाजवली, पण खानोलकरांच नाव सर्वतोमुखी झाले. खानोलकरांनी लिहिलेल्या कादंबर्याय ही अतिशय गाजल्या. त्यातील “चानी” आणि “कोंडुरा” या त्यांच्या दोन कादंबर्यांमवर चित्रपट ही प्रदर्शित झाले. कोंडूरा या त्यांच्या कादंबरीचा विषय अजब होता आणि त्या कादंबरीवर मा. सत्यजित रे यांना पण चित्रपट काढवा असे वाटते. त्याच्या चानी या कादंबरी ही मा.व्ही.शांताराम यांना मोहात टाकते व ते चानी हा चित्रपट काढतात. “दिवेलागणं” आणि “नक्षत्रांचे देणे” हे कविता संग्रह रसिकांना खुप भावले. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः मा.हृदयनाथ मंगेशकर पुढे आले आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ये रे घना’, ‘नाही कशी म्हणू तुला’सारखी गीते अमर झाली. सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा या मा.आरती प्रभू नावाच्या माणसाने ‘रात्र काळी घागर काळी’ सारखी कादंबरी लिहिली, ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला त्यांना अंत्र्याकडून शाबासकीही मिळाली. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘एक शून्य बाजीराव’ सारखे त्यांनी नाटक लिहिले आणि रंगायन सारख्या संस्थाने ते रंगभूमीवर आणले. त्यांचे अजब न्याय वर्तुळाचे या नाटकाचे प्रयोग जर्मनी पण झाले. “नक्षत्रांचे देणे” साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला. मा.आरती प्रभू यांचे २६ एप्रिल १९७६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
“नक्षत्रांचे देणे” आरती प्रभू.
मा.आरती प्रभू यांच्या कन्या सौ. हेमांगी नेरकर यांच्याशी साधलेल्या संवादातून मा.आरती प्रभू यांचे व्यक्तिमत्त्व प्रहार मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
http://prahaar.in/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B2/
काही गाणी आरती प्रभू यांची
ये रे घना
लवलव करी पात डोळं
तू तेंव्हा तशी
ती येते आणिक जाते
समईच्या शुभ्र कळ्या
“तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूल
मा.आरती प्रभू यांचे प्रकाशित साहित्य.
गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
कोंडुरा (कादंबरी, १९६६)
अजगर (कादंबरी, १९६५)
रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
आपुले मरण
जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
सनई (कथा संग्रह, १९६४)
राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
एक शुन्य बाजिराव (नाटक, १९६६)
सगेसोयरे (नाटक, १९६७)
अवध्य (नाटक, १९७२)
कालाय तस्मै नमः (नाटक १९७२)
अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
चि. त्र्य. खानोलकरांनी आरती प्रभू असे टोपण नांव का घेतले?