![0235 Aravalicha Vetoba](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2017/04/0235-Aravalicha-Vetoba.jpg)
बऱ्याचवेळा मित्रांकडून ऐकलेले हे एका जागृत देवाचे मंदिर पाहण्याचा मला योग आला. हे देऊळ वेंगुर्ल्यामधील शिरोडा येथे आहे. वि. स.खांडेकर शिरोड्याचे तर क्रिकेट विक्रमादित्य सुनील गावस्कर, साहित्यिक जयवंत दळवी, लालजी देसाई हे अरवलीचे आहेत.
सर्व वाईट शक्तींवर वचक ठेवणारा शक्तिवान देव म्हणजे वेतोबा ! प्रशस्त मंदिर आणि गंभीर पण तितकेच देखणे असे देवाचे रूप ! हा देव त्याच्या मुलुखात रात्री गस्त घालतो. त्याची पावले खूप मोठी. त्यामुळे भक्तगण त्याला सुमारे २।।- २।। फुटांच्या चामड्याच्या चपलांचे जोड अर्पण करतात.केळ्याचा पूर्ण घडच देवाला अर्पण केला जातो.तुम्ही आज चपला अर्पण केल्यात तर उद्या सकाळी त्या चपलांवर , देवाने वापरलेल्याच्या खुणा दिसतात, अशी तेथे भक्तांची श्रद्धा आहे.
–मकरंद करंदीकर
Leave a Reply