नवीन लेखन...

‘आर्चिज’ चा स्पेशल संवाद

भे’ट देणे’ म्हणजे आपण कुठल्या तरी स्थळाला, ठिकाणाला किंवा व्यक्तीला भेटायला जाणे असा एक अर्थ आहे आणि ‘भेट देणे’ म्हणजे आपण कुणाला तरी वस्तूरूपाने, पैशाच्या रूपाने वा इतर दृष्टीने काहीतरी ‘नजराणा’ ‘म्हणजे ‘भेट’ देतो.

ही ‘भेट’ देण्यासाठी काहीतरी प्रयोजन असते. कारण असते. एखादा सण उत्सव आणि उल्लेखनीय दिवस… काहीही असते. आता तर म्हणजे अलीकडच्या २०-२५ वर्षांपासून पृथ्वी दिन, महिला दिन, फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, रोज डे, साडी डे, पर्यावरण दिन, नववर्षारंभ दिन, दिवाळी, दसरा आणि असे अनेक दिन/दिवस साजरे केले जातात. या साजरा कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या कुणीतरी कुणाला तरी भेट देण्याच्या कृतीतून घडते.

अगदी अशाच प्रकारची एक घटना  १९७९ साली घडली. तेव्हा वर वर्णन केलेला/ले दिवस साजरे करण्याची प्रथा नव्हती किंवा फारशी प्रचलित नव्हती.

अनिल मूलचंदानी या तरुणाच्या वडिलोपार्जित .साडी विक्रीच्या दुकानामध्ये एकदा त्यांचे मित्रवर्ग जमले होते. नवी दिल्लीच्या कमलानगरचा परिसर मध्यम वर्ग आणि त्या पुढील उत्पन्न गट असलेल्या रहिवाशांचा एरिया. महाविद्यालयीन पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे सर्वजण ‘गेट टुगेदर’ करण्यासाठी जमा झालेले होते. त्यावेळी त्यांच्या साड़ी दुकानाशी संबंधित ग्राहकाने युनायटेड स्टेटसहून आणलेले दोन पोस्टर्स भेट म्हणून दिले. पुढे अनिलने त्यांच्या साडीच्या दुकानात ती पोस्टर्स लावली. दुकानात ग्राहक येतच असतात. अशाच एका ग्राहकाला ती पोस्टर्स आवडली. त्याने अनिलकडे ‘ती विकायला ठेवली आहेत का?’ अशी विचारणा केली. याच घटनेने अनिलला आयडिया आली. आणि १९७९ मध्ये अनिलने पोस्टर्स विकण्याचे दुकान सुरू केले. २०० चौरस फुटांच्या जागेत, ‘पोस्टाने पोस्टर्स पाठविण्याची सेवा’ सुरू झाली. त्यावेळी रु. १२ ची पहिली ऑर्डर मिळाली आणि ‘आर्चिज’ म्हणजे ‘The most special way to say you care’ सांगणाऱ्या भेटवस्तू विक्री करणाऱ्या दुकानाची मुहूर्तमेढ रोवली.

‘स्पेडिंग हॅपीनेस’ या ‘कॅचलाइन’ने वर्षामागून वर्ष, वर्षामागून वर्ष… अगदी आजपर्यंत ‘आनंद पसरविण्याचे काम आर्चिज’ने अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. या दुकानात सर्व उत्सव, प्रासंगिक क्षण, इ.ची भेटकार्डस् – पोस्टर्स, क्युरिअस, फोटो आल्बम्स, फोटोफ्रेम्स, टॉईज, मग्ज, कोटेशन्स, की चेन्स, स्टेशनरीजमधील व्हरायटी आणि बरंच काही जे एक मध्यम, उच्च मध्यम आणि उच्च वर्गाला आवश्यक साहित्य विक्रीस ठेवले गेले. तीन इंचाच्या रु. ४.०० एवढ्या मिनी ग्रीटिंग कार्डपासून तर साडेपाच फुटांएवढ्या उंच आणि रु १०,००० एवढ्या किमतीच्या टेडीबेअर (Teddy bears) पर्यंत सर्व भेट वस्तू या दुकानात मिळतात.

बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, यू.ए.इ., बहारीन या राष्ट्रांमध्ये ‘आर्चिज’ची दुकाने आहेत. ‘Greet ‘N’ Gift’ या नावाने देशभरात आर्चिज स्टोअर्स असून दरवर्षी ७ ते ८ हजार नवीन डिझाईन्स दरवर्षी बाहेर येतात. २००२/३ चा विक्रीचा ‘टर्नओव्हर’ रु. ७६० लाख एवढा होता. आता यात आणखी वाढ झालेली दिसेल.

-प्रा. गजानन शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 30 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..