हा नक्की संप आहे का?…
ही नक्की क्रांती आहे का?…
हे नक्की आंदोलनच आहे ना?
४८ हजार लीटर दूध रस्त्यावर ओतणारा शेतकरी आहे का?
शेकडो किलो भाजीपाला, धान्याची नासधूस करणारा हा खरोखर शेतकरीच आहे का?
हे सर्व मेहनतीनं पिकविणारे, हेच का ते शेतकरी,
गाड्या जाळणारे, टायर फोडणारे हे शेतकरीच आहेत का?
एवढी करोडो रूपयांची नासधूस करणाऱ्यांना खरोखरच कर्जमाफी हवीय का?
अमूल्य असा भाजीपाला, धान्य वगैरे फुकट घालवणाऱ्यांना, खरोखरंच बाजारमूल्य वाढवून पाहीजे का?….
हे सर्व आंदोलनकर्ते नक्की शेतकरीच आहेत ना, की महा’राष्ट्रा’त वाद निर्माण करणारे, गेली ७० वर्षे देशाची, राज्यांची, अर्थव्यवस्था बिघडवणारे, की सत्तेत असून सुध्दा, काहीही ‘खायला’ न मिळणारे अतृप्त आत्मे आहेत….
नक्की हे कोण आहेत, शेतकरीच आहेत ना?
— संकलन : शेखर आगासकर
सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम. लेखकाचे नाव मला माहित नाही.
Leave a Reply