दोघेही येती एकाच वेळीं श्रीकृष्णाच्या भेटीला,
अर्जून उभा चरणाजवळी दुर्योधन बसे उशाला ।।१।।
प्रथम दर्शनी नेत्र उघडता नजर गेली अर्जूनावरी,
प्रभूकडे तो आला होता आशीर्वाद त्याचे घेण्यापरी ।।२।।
दुर्योधन दिसे बघता पाठी अहंकाराने होता भरला,
मदत करण्या युद्धासाठी विनंती करी तो हरिला ।।३।।
युद्धामध्ये भाग न घेई सांगेन गोष्टी उपदेशाच्या,
परि सारे त्याचे सैन्य जाई लढण्या दुसऱ्या बाजूच्या ।।४।।
विश्वास होता सैन्यावरी दुर्योधन मागतो अनेक,
आशीर्वाद हवा होता अर्जून निवडतो एक ।।५।।
निवड करूनी श्रीकृष्णाची विश्वास येई स्वत:वरी,
अस्तित्व शक्ती जेथे प्रभूची जयश्री जाईल कशी दुरी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply