नवीन लेखन...

अरे पुन्हा….. !

हिंदीतील पहिला मल्टी स्टारर ” मेरा नाम जोकर ” होता आणि तो राज कपूरने केलेला भव्यदिव्य प्रयत्न होता. सुरुवातीला फसलेला आणि राज कपूरला गाळात घालणारा हा चित्रपट कालांतराने धो धो चालला आणि अजूनही प्रचंड लोकप्रिय आहे.

मराठीत जब्बार पटेलने असंच एक शिवधनुष्य उचललं – ” सिंहासन ” आणि ते काहीच्या बाही चालले. मराठीतील “हूज हू ” त्यात होते. राजकारण नामक भयानक दलदलीवरचा हा प्रखर आरसा होता. सध्याच्या राजकारणापेक्षा ते अधिक “दर्जेदार (?)” चित्र होते. आख्खे मंत्रिमंडळ तितक्याच वजनदार कलावंतांनी पेलले होते.

अरुण सरनाईक, डॉ लागू, (तरुण) मोहन आगाशे, (तरुण) नाना , (तरुण) रीमा, (तरुण) श्रीकांत मोघे आणि ही यादी लांबच लांब वाढविता येईल. प्रत्येकाने अतिशय ताकतीने, जीव ओतून वाट्याला आलेल्या छोट्या-मोठया भूमिका वठविल्या. अगदी पिटुकली भूमिका असलेला जयराम हर्डीकरही नजरेत राहून गेला. संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा कवेत घेण्याचे सामर्थ्य जब्बार मध्ये आहे, हे सिद्ध करणारा “सिंहासन ” कायमचा स्मृतीवर कोरला गेला. मराठीत इतका बांधीव आणि गोटीबंद चित्रपट निघू शकतो हेच १९७९ च्या श्वेतश्याम रंगांनी सिद्ध केले. दत्ता भट, मधुकर तोरडमल आणि सतीश दुभाषींचा उल्लेख सुरुवातीच्या ओळींमध्ये केला नाही तर तो मोठा गुन्हा ठरेल. आणि उषा नाडकर्णी, पूर्णिमा पाटील यांनाही विसरणे शक्य नाही.

हृदयनाथांनी सुरेश भटांची ” उषःकाल होता होता ” ही संगीतबद्ध केलेली गझल भारताच्या स्वातंत्र्य संग्रामावरचा जळजळीत ओरखडा आहे. आणि “अरे पुन्हा ” ची पाळी यावी हेही तितकेच दुर्दैवी नाही का? या गीतामधील लताचे आवाहन मोठे की प्रत्येक ओळीच्या पार्श्वभूमीवरील पडद्यावरचे विषण्ण वास्तव मोठे हे मला ठरविणे अजूनही जमत नाही – फक्त चटके मात्र बसत असतात.

राहिला एकमेव खंदा उल्लेख- दिगंबर उर्फ निळू भाऊ ! त्यांचा सर्वसामान्य पत्रकार भोवंडून टाकणारा होता. फुले एकदम वेगळे पण सच्चे, खरे, नैसर्गिक कलावंत होते. सगळ्या मांदियाळीत ते उठून दिसतात. आणि शेवटच्या प्रसंगात प्रेक्षकांना ओलावून जातात. मराठी मनाच्या “सिंहासन ” वर या माणसाचे अधिष्ठान कायमचे असणार आहे यात शंका नाही.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..