नवीन लेखन...

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ

(ईश्वर निर्मितीला जाणा)

ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असे अनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना, सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. पटवले गेले, सांगितले गेले. पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिके, रेडीओ, टीव्ही इत्यादी अनेक माध्यमे  वैचारिक जडण-घडणामध्ये भाग घेत होते. शाळेत शिक्षकांचे तत्त्वज्ञान व घरांत वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन ह्याचा मारा सतत होत होता. घरामधली नातेमंडळी मित्र – परिवार हे त्या त्या महान तत्त्वाला अनुसरुन वागणाऱ्या आणि इतरांना वागविण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. हे सारे दैनंदिन डोळ्यांदेखत होत होते, घडत होते.   अनेक प्रश्न समोर येत, परंतु ते काळाप्रमाणे, वयाप्रमाणे सोडविले जातील, याची जबरदस्त खूणगाठ मनामध्ये बांधण्यात परिसर, वातावरण व संस्कार यशस्वी झाले होते.

हिरा असा सहज प्राप्त होत नसतो. प्रचंड खोदकाम, श्रम केल्यानंतरच तो हाती लागतो. ह्या विषयीचे  तत्त्वज्ञान मनाला शंभर टक्के पटले होते. श्रम आणि साध्य ह्याचे अतूट नाते मनावर चांगलेच  बिंबले होते. हिऱ्याची तुलना ईश्वरासाठी करताना, जरी ते प्राप्त होण्यासाठी श्रमाची संकल्पना पटली, तरी मन साशंक होत राहिले. कारण श्रमानी हिरे प्राप्त केलेले अनेक दिसले, कळले होते. ईश्वरांचे मात्र तसेच असेल का?  हा प्रश्न मनांत घोळत होता. कारण हिऱ्याचे अस्तित्व बघीतले होते. ईश्वराचे तसे नव्हते. तो सर्वत्र आहे, महान आहे, हे तत्वज्ञान शंभर टक्के पटले होते. परंतु तो कुणाला भेटला, दिसला ह्याचा शोध वा बोध मात्र मनाला केव्हाच मान्य झाला नाही. फक्त सांत्वनासाठी त्याचा अनुभव घ्या, तेव्हा ईश्वराबद्दल कळेल हे मान्यवरांचे पांडीत्यपूर्ण तत्त्वज्ञान समजत होते, परंतु पटत नव्हते. कदाचित स्वत:मध्ये ते कळण्याची वा कळून घेण्याची पात्रता नसेल. हे मन सांगत होते. प्रयत्न केले, प्रचंड श्रम घेतले व हीरा प्राप्त झालेला आम्ही बघीतला होता. परंतु ईश्वराचे काय? तो कुणांला आज तागायत तरी दिसला, प्राप्त झाला हे ठामपणे कळले नव्हते. त्याच्या प्राप्तीची जगाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये, जागेमध्ये आणि केंव्हाही एक वाक्यता त्यावर  झालेली दिसली नाही. हा एक मात्र प्रखरतेने मान्यता पावलेले तत्वज्ञान दिसून आले की ईश्वर जरी प्रत्यक्ष दिसला भेटला नसला, तरी त्याच्यासंबधी अनुभव मात्र  अनेक थोर व्यक्तीना आलेले आहे. जे त्या ईश्वराचे दिव्य भव्य असे वर्णन केले गेले ते त्यांच्या आत्मिक प्रयत्नामध्ये अनुभवांनी साध्य केले. जे अनुभव सर्व सामान्यांना सहज मिळणार नाही असे अनुभव, अनेक व्यक्तींना आल्याचे ऐकू येते. मात्र जर ते त्या ईश्वरासंबंधीचे अनुभव होत असतील तर ते सर्वत्र परंतु सारखे असे असणारच नाही. ते भिन्नभिन्न असतील

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..