नवीन लेखन...

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ

विचारांची झेप, विश्लेषण, तर्क ह्या ज्ञानाच्या  माध्यमाला मर्यादा नसल्यामुळे, त्याचा आविष्कार देखील प्रचंड होऊ शकतो.

आता प्रश्न पडतो तो त्या ईश्वराच्या शोधाचा. मर्यादेचे साधन पंचेद्रीयाच्या माध्यमातून हे शक्य आहे का? सांगितल्या गेलेल्या, वर्णन केले गेलेल्या, सगुणात्मक ईश्वरी रुप हे केव्हाही प्राप्त होणारे नाही. कारण ते झाले विचारांच्या प्रचंड झेपामधून महान व्यक्तीकडून. व्यक्त झालेले वर्णन आहे. एकाचे वर्णन त्याला दुसऱ्याच्या खऱ्या अर्थाने वा आत्मिक स्तरावर दुजारा मिळाल्याचे जाणवला नाही. कारण हे केवळ त्यांचे अनुभव वर्णन असते. मानवी इंद्रियांच्या मर्यादा जाणताना फक्त एकच बाब मनांत ठसते व पटते. ते म्हणजे ईश्वरी अनुभव येतो त्याचा खरा आनंद समाधान होणे, येथे पर्यतच. मात्र हे ही त्यांनाच जे आपल्या प्रयत्नात ते ईश्वरी अनुभव प्राप्त करण्याच्या मार्गावर जात असतात. अनेक  व्यक्ती मी बघीतल्या, त्याचे जीवन चक्र बघीतले, त्या सर्व ईश्वर दर्शन वा अनुभव साक्षात्कार ह्या संकल्पनेतच गुरफटून गेलेल्या आहे. जीवनामधला बराच काळ ते साधनेत व्यतीत करतात.

अनेकांना निराशाच हाती लागलेली जाणवते. त्याचे प्रमुख कारण ही मंडळी कर्मकांडात, नामस्मरणात वा अशाच सांगितलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या मार्गात सतत व्यस्त राहतात. आयुष्याचा फार मोठा काळ ते ह्यात खर्च करतात. हे सारे चांगले आहे. समाधान देणारे आहे. त्याच्या मनाला शांतता देणारे असेल. त्याच्याशी सहमती आहे. त्यांनी तसा प्रयत्न करावा. कुणाच्या प्रयत्नाना व योग्य संकल्पनेला मी का विरोध करावा. मला तो अधिकारही नाही व माझी क्षमताही नाही. मात्र स्वअनुभव असा की ह्या सर्व प्रयत्नात शेवटी काहीच निश्चित होत नसते. फक्त समाधानाचा ध्यास केलेल्या प्रयत्नाला यश लाभते, ही केवळ जाणीव. काय करावे मग मी ? प्रश्न पडतो, ईश्वराचे अस्तित्व मान्य, त्याचे सर्व महान गुणधर्म मान्य केलेले आहेत. मात्र ते सर्व  निर्गुण ह्या संकल्पनेत. कारण हेच तर त्याचे अद्दष्य स्वरुप असते. जेव्हा अदृष्य स्वरुप हे वर्णन मी मनातून मान्य करतो. त्याचवेळी त्याच्या कल्पीलेल्या सगुण वा दृष्य स्वरुपासाठी फार अट्टाहास करणे गैर होईल. ते फक्त आयुष्य खर्ची केल्याप्रमाणे असेल. मग ह्या संभ्रमात, द्विधा मनस्थीत मी काय करावे ?  ह्या चिंतनात मी पडलो.

अचानक मला तेच संगीत तेच चित्र कला, तेच नैसर्गिक दृष्य …..सारे सारे आठवू लागले. ज्या घटनांनी मला प्रचंड समाधान, अत्यानंद दिला. मनाची शांतता त्यात मला दिसली.

एक ईश्वरी अनुभव आल्याचे वाटले. येथेच मनाने एक संकल्प केला.  ईश्वराचे जे काही अस्तित्व असेल ते त्याच्याच केलेल्या सर्व जगात, विश्वात विखूरलेले असेल.  प्रत्यक अणुरेणुमध्ये तो व्याप्त असेल.  हे सारे पटले कारण प्रत्येक वस्तू, प्रत्येत गोष्ट, प्रत्येक

सभोवताल हा ईश्वरमय असेल.  तर त्याला त्याच्याच कलाकृतीमध्ये शोध घेणे उचित ठरेल  कलेचा आनंद लूटा कलाराच्या शोधांत पडू नका  हा एक संदेश प्राप्त झाला. कारण ती कला देखील असामान्य आहे. मानव निर्मीतीच्या विचारांच्याही मर्यादेबाहेरची आहे. हीच कला अर्थात हे विश्व ह्याला संपूर्णपणे जाणणे, त्याचा आस्वाद घेणे, त्या कलेत एकरुप होणे हेच तर ईश्वरी सानिध्य असेल. न दिसणाऱ्या ईश्वर प्राप्तीसाठी जीवन व्यतीत करण्यापेक्षा, ईश्वर निर्मित सजीव निर्जीव ह्या सर्वांच्या ज्ञान प्राप्तीत, संबंधात एकरुपतेत, जाणीवेमध्येच तो दडला आहे. तेच मिळवण्याचा प्रयत्न व्हावा. असे मला वाटते. कर्म करा म्हणतात,  त्यातच  ईश्वर प्राप्ती आहे हे ऐकले आहे. कर्म अर्थात चांगले मनाला आनंद देणारे, समाधान मिळणारे कर्म कऱणे म्हणजे दैनंदीन व्यहार ईश्वरी कलाकृती निर्मीतीच्या सानीध्यात जाण्याचा एक मार्ग खऱ्या अर्थाने त्या ईश्वराला समजण्याचा एक प्रकार. ईश्वरी अनुभव म्हणतात ते हेच नव्हे का ?.

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..