सदानंद जोशी यांचा जन्म १६ जुलै १९२३ रोजी झाला.
“मी अत्रे बोलतोय !” हा कार्यक्रम म्हणजे मराठी रंगभूमीवरच एक आश्चर्यच होत. आचार्य अत्रे यांची नक्कल आणि तीही त्यांच्या वेशभूषेसह! सदानंद जोशी यांचा हा एकपात्री कार्यक्रम खुपच गाजला ! १९६१ साली ते पॅरीसला गेले व मार्सल मार्सो यांच्याकडे मूकाभिनयाचे शिक्षण घेतले.१९६४ साली अत्रेंच्या परवानगीने त्यांनी मी अत्रे बोलतोय, हा कार्यक्रम सादर केला. तीस वर्षांच्या कालावधीत एकूण ३००० प्रयोग त्यांनी केले.
पुलंचा ‘बटाट्याची चाळ’ हा कार्यक्रम काल्पनिक व्यक्तिरेखांवर आधारलेला होता. पण अत्र्यांना लोकांनी पाहिले होते. म्हणूनच सदानंद जोशी यांचे धाडस मोठे होते. सदानंद जोशी यांच्या ‘मी अत्रे बोलतोय…या कार्यक्रमाला दर्जेदार परंपरा लाभली आहे. विनोदी साहित्य यांचेही एकपात्री नाट्यप्रयोगानुकूल रूपांतर केले जाते. एवढेच नव्हे, तर आचार्य अत्र्यांसारख्या नाट्यमय जीवन जगलेल्या व्यक्तीवरही एकपात्री नाट्यप्रयोगाची उभारणी करता येते. मी अत्रे बोलतोय या सदानंद जोशींच्या प्रयोगात केवळ नकलेपेक्षा अधिक काहीतरी आढळते व हे अधिक काहीतरी एकपात्री नाट्यप्रयोगाच्या स्वरूपाचे निदर्शक ठरते.
या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला आचार्य अत्रे स्वत: उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर अत्र्यांनी केलेल्या भाषणात सदानंद जोशी यांना प्रशस्तिपत्र देताना अत्रे म्हणाले “सदानंद जोशी यांनी मला जिवंतपणी अमर केल आहे.” मी अत्रे बोलतोय!
शं. ना. नवरे यांनी ललित मासिकात ‘मी अत्रे बोलतोय…’ या कार्यक्रमाबद्दल म्हणले आहे. ‘मी अत्रे बोलतोय’ या चरित्रकथनाच्या (!) पहिल्या प्रयोगानंतर कथनकार श्री. सदानंद जोशी अत्र्यांच्या घरी कार्यक्रमाबद्दल त्यांचं मत विचारायला गेले. “मी सादर केलेला कार्यक्रम कसा वाटला आपल्याला ? ” जोशींनी नम्रतेने विचारलं. “झकास ! : अत्रे ताडकन म्हणाले. ” जोशीबुवा, असा कार्यक्रम आम्ही पाच हजार वर्षात पाहिलेला नाही. पुढच्या लाख वर्षात त्याचे तुम्ही कोट्यावधी प्रयोग कराल, याबद्दल आम्हाला मुळीच शंका नाही ! “
सदानंद जोशी यांनी हास्यकल्लोळ चे १००० हुन अधिक प्रयोग,एकपात्री स्वामी चे ५० प्रयोग केले होते. सदानंद जोशी यांना नाट्यदर्पणचा “मॅन ऑफ द इअर पुरस्कार मिळालं होता.
अत्रेंच्या श्यामची आई फिल्म ला पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता त्यात मोठा शामचे काम सदानंद जोशींनी केले होते.
हशा आणि टाळ्यांद्वारे लाखोंच्या सभा खिशात घालणारे आचार्य अत्रे यांची हुबेहूब नक्कल करणारे सदानंद जोशी यांच्या ‘मी अत्रे बोलतोय’ या ध्वनिफित दुर्मिळ कलाकृतींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘तरंग ऑडिओ व्हिडीओ प्रॉडक्ट्स’ची ही निर्मिती केली असून जोशी यांचे अत्यंत दुर्मिळ ध्वनिमुद्रण तीन ऑडिओ सीडींच्या संचाच्या स्वरूपात ऐकण्यास मिळणार आहे. हे ध्वनिमुद्रण प्रत्यक्ष प्रयोगा दरम्यानचे असल्याने ‘हशा आणि टाळय़ां’सकट हे ध्वनिमुद्रण ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला उपस्थित असणाऱ्या आचार्य अत्रे यांनी केलेले भाषणही या संचात समाविष्ट आहे. या भाषणात अत्र्यांनी शिवरामपंत परांजपे, अच्युतराव कोल्हटकर यांच्या बोलण्याची ऐकवलेली झलकही रसिकांना ऐकण्यास मिळेल. आचार्य अत्रे यांच्या भाषणासह या कार्यक्रमाचा तीन ऑडिओ सीडींचा संच उपलब्ध आहे.
सदानंद जोशी यांचे १२ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे सदानंद जोशी यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply