कुठले नाते? खरे की खोटे?
काही कळेनासे वाटे !
बंधने तोडोनी नात्यांची,
इज्जत गेली पुर्षार्थाची !
कशी नाही रे शर्म वाटली तुला,
आपल्याच मुलीची अब्रू लुटतांना?
जन्मदात्यानेच अब्रू लुटल्यावर,
समजले मला आईच्या नशिबीचे भोग !
विश्वासावे सख्या भावावर,
पण त्यानेही केला कळस सर्वांवर !
जन्मल्याच केली असतीस हत्या तर,
निदान अब्रू आली नसती चव्हाटयावर !
तूटले असते माझे नाते तुमच्या बरोबरचे
मुलगी आणि बहिणीचे !
काय माझ्याकडून प्रज्ञापराध झाले,
ज्याने मी अनाथ आणि पोरकी झाले !
बेअबृची लक्तरे माझ्या नावापुढे चिकटली,
आणि जीवनाची घडी विस्कटली !
देवा हात झाडूदेत स्त्रीची अब्रू लुटणाऱ्यांचे,
तरच देवा मिळेल तिला खरा ज्ञाय !
चित्र दिसूदे स्त्रीचा सन्मान करतांना,
नाहीतर लागेल सर्वांना तिची हाय !
देवा शिकव सर्व नराधमांना,
स्त्रीचा मान ठेवायला !
आणि सुरक्षा देण्याला,
नाहीतर दिसेल इतिहासाची पुनरावृत्ती होतांना !!
स्वप्नातही आणू नकोस अशी काळ-वेळ कुणावर,
नाहीतर निसर्ग कोपेल आपल्यावर !
जगदीश पटवर्धन
Leave a Reply