असे दान द्यावे की,
समोरचा अचंबित व्हावा,
मापे भरून ओतावे,
हात ओसंडून वहावा,
करावे रक्तदान सारखे,
रुग्णांसाठी ते जीवनदान,
अन्नदानासारखे पुण्य नसते, भुकेल्याला करते तृप्त,
विद्यादान श्रेष्ठ दान,
सरस्वती प्रसन्न होई,
दुसऱ्याला दिल्याने ज्ञान,
आपुले बघा वाढत जाई
कला दान करता आपण,
निर्मितो एक कलाकार,
सेवा तिची करत करत,
जिवंत,ठेवेल कला तर ,
अवयव दान केल्याने पण,
एका असहाय्य वरच उठे ,
अशा रुपे जगतो माणुस,
पुन्हा जसे जगाया मिळे, नेत्रदानाची महती सगळी,
डोळस होतात काही अंध,
दुनिया बघत बघत सगळी,
आनंदे बागडती स्वच्छंद,
शरीर त्याचे- डोळे आपुले,
दृग्गोचर होण्या आपली दृष्टी,
नजर करून पुन्हा पारखी,
वेगळीच सारी भासते सृष्टी,
निसर्ग देतो जसे भरभरून’,
अलोट, असीम दानाचा सागर,–
दातृत्व दाखवावे लुटून-लुटून,
उदारतेचेच व्हावे आगर–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply