असे जगावे, तसे जगावे,
मला वाटते मुक्त जगावे,
कधीही कुठले बंधन नसावे, ताणतणाव चिंता समस्या,
अगदी त्यांना कोळून प्यावे,–!!!
जीव टाकत स्वच्छंदाने,
मुक्त विहरत मस्त रहावे, फुलपाखरू होऊन सगळे,
जीवनाचे मर्म लुटावे,–!!!
कधी कस्तुरी व्हावे वाटे,
सुगंध फैलावण्या सारे,
वाऱ्याने त्याचेच गान गावे,
घेऊन जग तृप्त व्हावे,–!!!
कधी वाटते डोंगरदरीत,
हरणउड्या मारत हिंडावे,
स्वैर आपुले आभाळचआपण, आपल्या हाते खाली आणावे,–!!!
कधी वाटे गरुड व्हावे,
ऐटदार पंख फैलावत,
साऱ्या पृथेवर राज्य करावे,
कधी वाटे कोकरू व्हावे,
इकडून तिकडे उड्या मारत, पटकन कुणाच्या कुशीत शिरावे,–!
कधी वाटे मधमाशी व्हावे, फुलांफुलातील मध चाखत, साठवण करत करत रहावे,
कधी वाटते राजहंस व्हावे पाणियात डुंबत डुंबत,
दिमाखाने झकास जगावे,–!!!
नकोत सगळे प्रश्न हे,
नकोशी ज्यांची उत्तरे,
माणूसपण सोडून देऊन,
थोडे जगून पहा बरे,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply