असे कसे विसरलास,आपुल्यातील गोड नाते,
माझे,होते ना तुझे,
तुझे असायचे रे माझे,–!!!
जीव तुझा कासावीस,
होई मला उलघाल,
मनाचे सोड, तनाचे,
मग सोसते हाल-हाल,–!!!
प्रीतीची हूल तुझ्या,
कशी गावीही नाही,—
बनशी असा रुक्ष की,
प्रेमाचा लवलेशही नाही,–!!!
तरल, मृदू, नाजूक,
प्रीत पुन्हा कधी फुलेल,
शेजेवरील मोगरा,
पुन्हा कधी बहरेल,-?
तारुण्याचा बहर आपुला, ओसरला नाही पुरता,
तरीही दाखवशी किती,
तू मात्र उदासीनता,–?
अजूनही, रात्र येतां,
मनचाफा दरवळतां,
आठवणींच्या झुल्यावर,
राहून राहून हिंदळता,–!!!
मुसमुसत्या तारुण्याला,
वाटे एकलेपणा,—
तुझे असे डोळे झाकणें,
लहर दुःखाची उन्मळता,–!!!
माझ्यासाठी संजीवन तू ,
तुझ्यासाठी मी दामिनी,
आकाशीची प्रेमल जादू,
बरसे मग, अमृतवाहिनी,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply