असे किती वेळा होते की आपण कोणाला तरी मेसेज पाठवतो आणि त्याच्या उत्तराची वाट पहातो. त्या माणसाचे उत्तर मात्र येतच नाही.
किती वेळा आपण छान तयार होतो. आपल्याला वाटते कोणीतरी आपली प्रशंसा करेल. आपण छान दिसत आहोत असे कोणीतरी आपल्याला म्हणेल. आपल्याकडे मात्र कोणी पहातच नाही.
असे अनेकदा झाले आहे की आपण कोणाच्या तरी फोनची वाट पहात असतो. तो फोन आपल्याला आनंद देणारा असतो. मात्र तो कॉल कधी येतच नाही.
आपण खूप मेहनत करुन एखादी सुंदर रचना करतो. आपल्याला वाटते कोणीतरी त्याचे कौतुक करावे. आपल्या मेहनतीची दाद द्यावी. तसे घडत मात्र नाही.
अगदी लहानपणापासून आपल्याला हे शिकवलेले असते की तुमची किंमत लोकांनी दिलेल्या पसंतीवर ठरते. लहान असताना शाळेतली शिक्षिका हातावर एक स्टार काढते आणि आपल्या कामावर तिच्या पसंतीची पावती देते.
अजून थोडे मोठे झाल्यावर आपण किती लोकप्रिय आहोत याचा विचार आपण करु लागतो. धारणा हीच असते की किती लोकांनी आपल्याला पसंती दर्शविली.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply