रोपट्याचे होते झाड,
झाडाचा होतो वृक्ष,
वृक्षातून मिळते बी,
असे निसर्गाचे चक्र, –!!!
पाण्याची होते वाफ,
वाफेचे होतात ढग,
ढगांचे पुन्हा पाणी,
असे निसर्गाचे चक्र,–!!!
सृष्टी मातीतून जन्मे,
चराचरातील घटक,
घटकांचे होते विसर्जन,
मातीत जातात मिळून,
असे निसर्गाचे चक्र,–!!!
जन्मतात किती झरे,
जाऊन मिळती नदीला,
नदी एकरूप सागराशी,
सागरांतुनी पुनश्च वाफ,
असे निसर्गाचे चक्र,-!!!
कचऱ्याचे होते खत,
झाडाला लागती फळे-फुले, कचऱ्यातच रूपांतर होते,
असे निसर्गाचे चक्र,–!!!
प्राणी, पक्षी, मानव,
जन्मे,जगे वर्षानुवर्षे,
*जन्मातूनच मरण जन्मे,
असे निसर्गाचे चक्र,–!!!
एक रूप एक रंग,
बनवती अधिक संग,
अशाने रंगसंगती वाढे,
असे निसर्गाचे चक्र,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply