असीम, अपार, अमाप उदंडा, कुठून आणावे मापदंडा, विशाल विस्तीर्ण जगड्व्याळां तूच बनतोस गुरु आभाळा-!
तुझ्यासारखा नाही दाता तुझ्यासारखा नाही त्राता,
तूच एकटा तुझ्यासारखा,
अतुल अजोड तूंच अनंता,–!!
तूच घालशी जन्मा,
पृथ्वीवरील संजीवनी,
तूच राखीशी जलसाठा ,
सांभाळुनी अजस्त्र मेघां,–!!!
तुझ्यातूनच उठते दामिनी,
तूंच निसर्गाची करणी,
तूच देशी तूच सावरशी ,
धरेवरील अखिल चराचरा,–!!
वास करे भगवंत जिथे,
जागा देशी पुण्यवाना,
बघे त्रैलोक्याचे राज्य सारे,
ही मृत्यूनंतरची कल्पना,–!!!
ओढ वाटून ही धरा,
तुझ्यासाठी तरसत राहते
मग कधीतरी तुझी दया,
तिच्यावरती बरसत राहते, तुझ्यामुळे ती बनते सजीव,
पाझरत रहावे कृपाळा,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply