अशावेळी…………………..?
जीवनात एखाद्या वस्तूची , गोष्टीची, जिकांयची ,प्रेमाची(टिप-प्रेमाचे अनेक पैलू आहेत.आई-वड़ील,भाऊ-बहीण,गुरू-शिष्य आई-मूलं ,पती-पत्नी,प्रियकर-प्रेयसी इत्यादी त्यामूळे एकच निकष लावू नये.)कमतरता असेल.तर आपल्या सुप्तमनात तो विषय कायम ठाण मांड़लेला असतो.आपलं अचेतन मन कायम अनेक वर्षे त्यावर एकांतात विचार करत राहतं. जे आपल्या चेतन मनाला कळत ही नाही.
अचानक खूप कालावधी नंतर ,नकळत आकर्षणाचा सिध्दांत आपलं काम करून जातो.चेतन मनाला कधीच कळत नाही.
आणी मग जी गोष्ट आपल्याला हवी होती.ती मिळण्याचे संकेत दिसू लागतात.
मग अशावेळी खूप द्विधा होते.जी गोष्ट आजपर्यंत आपल्या जीवनात नव्हती .त्यामूळे फारसं काही अड़लं नाही.आणी पूढेही फारसा फरक पडेल का ?सांगता येणार नाही.मग आपल्या मनातील सूप्त इच्छा #
आसक्ती ठेवल्यामूळे मिळाली असेल तर स्विकारावं अथवा नाही?तसचं याच्या अगदी विरूध्द वाचनात आलेलं संत ,महात्मे सांगून गेले माणसाने आसक्ती ठेवू नये. आणी आकर्षणाचा सिध्दांत सांगतो की आसक्ती हवीच या संभ्रमात स्वःताचा पार अभिमन्यू होतो.
अशावेळी मनाचा आनंद जपावा की बूध्दीचा मान ठेवावा
असा अभिमन्यू झालाय का कूणाचा?
© वर्षा पतके थोटे
Leave a Reply