नवीन लेखन...

अशी गाणी, अशा आठवणी…..

आधुनिक वाल्मीकी ग.दि.माडगूळकरांच्या जीवनातील अनेक अज्ञात ह्रदयस्पर्शी प्रसंग आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अपकाशित पैलूंवर प्रकाशझोत टाकणार्‍या विविध आठवणींचा ‘‘मंतरलेल्या आठवणी‘‘ ह्या श्रीधर माडगूळकरांच्या लेखणीतून साकारलेल्या पुस्तकातील एक आठवण खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.


आषाढाचे दिवस… कोल्हापूरच्या रंकाळा तलावातीलरम्य परिसर…. सूर्याने केव्हाच काढता पाय घेतलेला….पण मागे रेंगाळलेल्या काही चुकार किरणांुळे सार्‍या परिसरावरचफिकट गुलाबी रंगाचा मुलामा चढलेला… हवेत अर्थातच सुखदगारवा पसरलेला. रंकाळ्याच्या एरवी शांत असणार्‍या पाण्यातकाही लाटा उमटत होत्या. किनार्‍यावर त्या थडकताच अंगावरउडणारे तुषार मनाला सुखवून जात होते. दूरवर अंधुक प्रकाशातधूसर दिसणारी संध्यामठाची देखणी इमारत अधिकच सुंदर दिसतहोती. आणि या भारलेल्या वातावरणात दोन तरुण झपाझपा पावलेटाकीत चालताना भावी आयुष्याचे मनोरे रचत होते…एवढ्यात त्या दोघांचे लक्ष समोरून आपले यौवन सावरीतयेणार्‍या एका सावळ्या पण अतिशय देखण्या अशा तरुणीकडेगेले. ती आपल्याच तंद्रीत स्वतःशीच लाजत त्या दोघांकडे केवळएक चोरटा कटाक्ष टाकत पुढे निघून गेली. योगायोगाने तेवढ्यातआकाशातही झपकन वीज चमकून गेली. त्या दोघांपैकी काहीशाउंच आणि स्थूल तरुणाने दुसर्‍याकडे पाहून केवळ एक स्मितकरून म्हटले, ‘‘हा घे, तुझ्या नव्या भावगीताचा मुखडा…सावळाच रंग तुझापावसाळी नभापरिआणि नजरेत तुझ्यावीज खेळते नाचरीते दोन तरुण म्हणजे पुढे मराठी चित्रपट आणि भावगीत सृष्टीत ‘अद्वैत’ठरलेले दिग्गज ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडकेच होते.

१९७० साल. पुण्यात गणेशखिड रोडवरच्या कस्तुरबा मंगलकार्यालयात जणू साक्षात् दुसरे मराठी साहित्य संमेनचच भरले होते. प्रसंगचतसा होता. गदिमांची द्वितीय कन्या कल्पलताचा विवाह ‘हंस’, ‘मोहिनी’,‘नवल’ या मासिकाचे देखणे, सुविद्य संपादक आनंद अंतरकरांशी साजराहोत होता. हा ऋणानुबंध गदिमांचे परमस्नेही सुप्रसिद्ध साहित्यिक पु. भा.भावे यांच्या मध्यस्थीने ठरला होता. त्यामुळे अगदी पु. ल. देशपांड्यांपासूनद.मा. मिरासदारापर्यंत झाडून सारे साहित्यिक या मंगलप्रसंगासाठी खासआवर्जून उपस्थित होते. मराठी चित्रपटसृष्टीचे तर हे

घरचेच कार्य होते.मान्यवर दिग्दर्शकांपासून क्लॅपर बॉयपर्यंत सारेच जण या आनंद-सोहळ्यातमिरवत होते.लग्न-समारंभ उत्तम पार पडला. मिष्टान्न भोजनास उशीर असल्यामुळेगदिमा आणि त्यांचे मित्रमंडळ एका बाजूला पत्ते खेळण्यात गुंग झालेहोते. एवढ्यात गदिमांचे लक्ष त्यांच्याजवळ नुकत्याच येऊन बसलेल्यासुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गबाल्यांकडे गेले. त्यांच्या अस्वस्थ हालचाली पाहूनत्यांनी विचारले, ‘‘काय रे राम, तुला बरे बिरे नाही काय ?’’‘‘तसे नाही अण्णा पण…‘‘पण काय ?’’‘‘अण्णा, रागवू नका. पण तुच्याकडे एक फार महत्त्वाचे काम आहे.’’‘‘काय ?’’‘‘गुरुदत्त फिल्मच्या सिने ासाठी एक गाणं लिहून हवं आहे.संध्याकाळीच रेकॉर्डिंग केलं पाहिजे. स्टुडिओ पण बुक केलाय.’’‘‘अत्ता ? इथं ? अरे राम, माझ्या मुलीचा लग्नसोहळा चाललाय.थोड्या वेळात जेवणाच्या पंगती सुरू होतील.’’‘‘अण्णा, तुम्ही मनावर घेतलं तर दोन मिनिटात माझं काम होईल.’’राम गबाले मोठ्या अजिजीने म्हणाले.

‘‘बरं, गाण्याची सिच्युएशन तरी सांगशील का ?’’‘‘या जगात कुणी कुणाचे नाही याची जाणीव करून देणारा चित्रपटाचादुःखद प्रसंग राम गबाल्यांनी सांगताच गदिमांनी राम गबाल्यांनीच बरोबरआणलेले कागदाचे पॅड मांडीवर घेतले आणि मुलीच्या लग्न-प्रसंगाच्याआनंद-सोहळ्यात नातेवाईक, मित्रमंडळींच्या आनंदी मेळाव्यात पांढर्‍याशुभ्रकागदावर,-‘‘लळा जिव्हाळा शब्दच खोटेमासा माशा खाईकुणी कुणाचे नाही, राजाकुणी कुणाचे नाही.’’‘जिव्हाळा’ चित्रपटातील हे कलीयुगाचे ब्रह्मवाक्य एक मंतरलेलीलेखणी लिहून गेली…

— श्रीधर माडगूळकर

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..